Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विराटच्या निर्णयानंतर ‘BCCI’ ने दिलीय प्रतिक्रिया; पहा, काय म्हटलेय सचिव जय शाह यांनी..

मुंबई : भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहली याने राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या पराभवाबरोर संघाने कसोटी मालिकाही गमावली. त्यानंतर विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यावर आता क्रिकेट विश्वातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बीसीसीआयनेही या मुद्द्यावर तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. याआधी कर्णधार पदाचा जो वाद निर्माण झाला होता, त्यावेळी बीसीसीआयने तातडीने प्रतिक्रिया दिली नव्हती. यावेळी मात्र मंडळाने उशीर केला नाही.

Advertisement

विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्यासाठी त्याचे अभिनंदन. विराटने असा निडर संघ तयार केला की जो घरात आणि घराबाहेर कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला टक्कर देण्याची धमक राखतो. त्याच्या कार्यकाळात मिळालेले कसोटी विजय हे खास आहेत, असे जय शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेस सांगितले.

Loading...
Advertisement

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभवानंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले आहे. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनीनंतर कोहलीची कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 1-2 ने गमावल्याच्या एका दिवसानंतर कोहलीने ही घोषणा केली. पण आता भारतीय कसोटी संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठी तीन मोठ्या खेळाडूंची नावे पुढे येत आहेत. रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंपैकी एकाची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

विराट कोहली ने घेतला मोठा निर्णय, कसोटीचे कर्णधारपदही सोडले

Advertisement
Advertisement

Leave a Reply