Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता कसोटी संघाचा कर्णधार कोण..? ‘हे’ तीन खेळाडू आहेत दावेदार; जाणून घ्या..

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभवानंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले आहे. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनीनंतर कोहलीची कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 1-2 ने गमावल्याच्या एका दिवसानंतर कोहलीने ही घोषणा केली. पण आता भारतीय कसोटी संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठी तीन मोठ्या खेळाडूंची नावे पुढे येत आहेत.

Advertisement

रोहित शर्माला नुकतेच टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅटचे कर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कसोटी कर्णधार होण्याच्या दाव्यात रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, रोहित शर्माने अद्याप भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद स्वीकारलेले नाही. पण T20 आणि एकदिवसीय क्रिकेटनंतर BCCI रोहित शर्माला टेस्टमध्येही कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते.

Advertisement

रोहित शर्मानंतर केएल राहुलही कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा दावेदार आहे. केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांपैकी एका सामन्यात कर्णधारपद सांभाळले होते. केएल राहुल प्रथमच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार होता. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय रोहितच्या जागी राहुलला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Loading...
Advertisement

जसप्रीत बुमराह तिसरा सर्वात मोठा दावेदार आहे. अलीकडेच, जसप्रीत बुमराहकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जागतिक क्रमवारीत आघाडीवर पोहोचला आणि त्याच्याच नेतृत्वाखाली संघाने ऑस्ट्रेलियात संस्मरणीय मालिका जिंकली. कोहलीने नुकतेच टी-20 कर्णधारपद सोडले होते आणि नंतर बीसीसीआयने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून वगळले होते.

Advertisement

धक्कादायक! एका पराभवाने भारताला लागला जोरदार धक्का, बिघडले अनेक समीकरण

Advertisement
Advertisement

Leave a Reply