Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! एका पराभवाने भारताला लागला जोरदार धक्का, बिघडले अनेक समीकरण

मुंबई – तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव करुन दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत (WTC 2021-2023) आपले स्थान सुधारले आहे. ही कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा संघ आता 24 गुणांसह ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानावर आला आहे. कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमध्ये आफ्रिकाने 2 जिंकले आहे तर एका सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे त्यांनी भारताविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकले.

Advertisement

सध्या भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकाचे गुण जास्त आहेत. दक्षिण आफ्रिकेला 56.66 टक्के गुण आहेत. तर भारताची टक्केवारी 49.07 आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतापेक्षा पुढे आहे. भारताने आतापर्यंत 4 सामने जिंकले आहेत तर 3 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय 2 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

Loading...
Advertisement

भारतीय संघाला आता त्यांच्या उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये अप्रतिम खेळ दाखवावा लागणार आहे. कारण आता येत्या मालिकेत भारतीय संघ पराभूत झाला तर अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी अडचण निर्माण होणार.

Advertisement

भारत पुढच्या महिन्यात श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.यावेळी अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दावा प्रबळ आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ सध्या टॉप 2 मध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 83.33 आहे आणि ती सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेच्या संघाची विजयाची टक्केवारी सध्या 100 आहे. ज्यामुळे तो अव्वल स्थानावर आहे. यावेळी ऍशेस मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीकडे वाटचाल केली आहे.(Shocking! One defeat hit India hard, many equations went wrong)

Advertisement
Advertisement

Leave a Reply