मुंबई – तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (SA VS IND) भारताचा पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. या पराभवामुळे भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) संतापले आहे. त्याने टीम इंडियाच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. केपटाऊनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे यजमानांनी तीन गडी गमावून पूर्ण केले.
चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला 111 धावांची गरज होती आणि त्यांनी या धावा सहज केल्या. सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सवर भाष्य करताना चौथ्या दिवशीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले भारताची रणनीती बरोबर नव्हती. भारतीय संघाने आधीच हार मानली . लंच ब्रेकनंतर कर्णधार कोहलीने आपल्या स्ट्राईक गोलंदाजांना सोडून रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव यांना गोलंदाजीवर लावले.
बुमराह-शार्दुलला गोलंदाजी का मिळाली नाही?
ही रणनीती पाहून गावस्कर म्हणाले जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांनी दुपारच्या जेवणानंतर गोलंदाजी का केली नाही हे मला अजूनही कळत नाही. हे माझ्यासाठी एक रहस्य आहे. आता जिंकणार नाही हे भारताने आधीच मान्य केले आहे असे वाटत होते. गावसकर यांनी मैदानावरील स्थितीवरही प्रश्न उपस्थित केले.
गावसकर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचेही कौतुक केले. तो म्हणाला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध शानदार फलंदाजी केली. कोणत्याही दबावाशिवाय 200 पेक्षा जास्त धावसंख्या चौथ्या डावात जिंकण्याची ही त्यांची सलग दुसरी वेळ होती.
जोहान्सबर्गमध्येही दक्षिण आफ्रिकेला 241 धावा सहज केले. आता 19 जानेवारीपासून दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.