Take a fresh look at your lifestyle.

आफ्रिकेत पराभवानंतर टीम इंडिया मध्ये होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल..

मुंबई –  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला (South Africa VS India) पराभवाचा सामना करावा लागला . सहाव्या क्रमांकावर असलेल्या आफ्रिकेने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचा 2-1 ने पराभव करून मालिका आपल्या खिश्यात घातली.

Advertisement

मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. वाँडरर्स आणि केपटाऊन येथे झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी प्रामुख्याने निराशा केली. स्वतः कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली . मात्र, आता भारताला घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या या मालिकेत काही महत्त्वाचे बदल जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

रहाणे-पुजारा यांना डच्चू?

Advertisement

संघाचे अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत पूर्णपणे निराश केले. या दोन्ही फलंदाजांवर संघाची मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी होती मात्र ही जोडी त्यांना पार पाडण्यात अपयशी ठरली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी अर्धशतक ठोकले आणि मालिकेत जवळपास 25 च्या सरासरीने धावा केल्या. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्यांना संघातून डच्चू देण्यात येणार असल्याचे संकेत समोर आले आहे.

Advertisement

श्रेयस-हनुमा विहारीला संधी?

Advertisement

पुजारा आणि रहाणे यांना संघातून डच्चू दिल्यानंतर त्यांच्या जागी फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीची जागा निश्चित मानली जात आहे. अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणात शतक झळकावले होते, तर विहारीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत संयमी आणि लढाऊ खेळी खेळून आपला दावा पक्का केला होता.

Advertisement

जडेजाचे पुनरागमन

Advertisement

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून बाहेर झाला होता. माञ मायदेशात त्याचे पुनरागमन निश्चित आहे. तो तंदुरुस्त राहिल्यास अश्विनसोबत फिरकी जोडी म्हणून पुनरागमन करण्याची खात्री आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply