Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून आता टीम इंडियासाठी प्रत्येक सामना फायनल; पहा, कोणत्या नियमांचा बसू शकतो फटका ?

मुंबई : दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी क्रिकेट मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशीप गुणतालिकेत संघ मागे पडला आहे. तसेच आता ही चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकण्याच्या मार्गातील अडचणी वाढल्या आहेत. आता भारतीय संघासाठी या पुढील प्रत्येक सामना महत्वाचा ठरणार आहे. कारण, आता एक जरी पराभव झाला तर संघाला फायनलच्या शर्यतीमधून बाहेर व्हावे लागेल.

Advertisement

आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशीप दुसऱ्या सत्रासाठी नवे नियम लागू केले आहेत. याआधीच्या सत्रात टीमच्या विजयावर रँक निश्चित होत असे. यंदा कसोटी सामन्याच्या एकूण टक्केवारीवर रँक ठरणार आहे. सध्या टीम इंडियाने सर्वात जास्त 4 टेस्ट जिंकल्या आहेत. त्यामुळे भारतीय टीम 49.07 टक्क्यांसह 5 व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पराभवामुळे क्रमवारीत आणखी घसरण झाली आहे.

Advertisement

श्रीलंकेनं दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवल्याने हा संघ 100 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त 40 पॉईंट्स जिंकले असून ही टीम 83.33 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा नंबर आहे.

Loading...
Advertisement

या सत्रात भारतीय संघाचे एकूण 18 कसोटी सामने होणार आहेत. यापैकी आता 9 कसोटी सामने बाकी आहेत. यामध्ये श्रीलंकेविरुद्ध 2, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 तर बांगलादेश विरुद्ध 2 टेस्ट होणार आहेत. भारतीय टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी या सर्व टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. उर्वरित 9 टेस्टमधील एखाद्या टेस्टमधील पराभव देखील टीम इंडियास फायनलच्या शर्यतीतून बाहेर काढणारा ठरू शकतो.

Advertisement

… म्हणून श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आयपीएलसाठी एकदम तयार; जाणून घ्या, काय आहे महत्वाचे कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply