Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पुजारा आणि रहाणेच्या निवडीबाबत विराटचा थेट उत्तर, जेव्हा पर्यंत…

मुंबई –  दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा स्वप्न भारताचा भंग झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सेंच्युरियन येथील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने गती गमावली आणि त्यानंतर मालिकेत पुनरागमन करण्यात अपयश आले. केपटाऊन कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली संघाच्या कामगिरीबद्दल बोलला. यादरम्यान त्याने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या निवडीबाबतही आपले मत मांडले.
सध्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे खराब फॉर्म आहे . टीम इंडियाच्या पराभवाचे हे देखील एक मोठे कारण आहे . दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण मालिकेत सुमारे २५ च्या सरासरीने धावा केल्या. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदे कर्णधार कोहलीला दोन्ही खेळाडूंवर प्रश्न विचारण्यात आले. यावर विराटने स्पष्ट केले की, निवडकर्त्यांची इच्छा असल्यास दोन्ही खेळाडूंना वगळले जाऊ शकते, परंतु जर त्यांना कसोटी संघात ठेवले तर आम्ही या दोन्ही खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देणार.
विराटला विचारण्यात आले की, दोन्ही फलंदाज बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये नाहीत. अशा स्थितीत त्यांना संधी कधीपर्यंत दिली जाणार? या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये किती काळ टिकवायचा विचार सुरू आहे. यावर कर्णधार विराट कोहली म्हणाला, “मी आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोन्ही खेळाडूंना शेवटपर्यंत साथ देऊ. या दोघांनी यापूर्वी भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे.

Loading...
Advertisement

याशिवाय, दोघांचे भवितव्य निवडकर्त्यांच्या हातात आहे, असे तो स्पष्टपणे म्हणाला. तो म्हणाला, “निवडकर्त्यांनी जर  त्यांना संघात ठेवले तर आम्ही दोन्ही खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देऊ. जर निवडकर्त्यांचा काही वेगळा विचार असेल तर मी यावर काहीही बोलू शकत नाही. हे त्यांचे काम आहे.”
विराटने पराभवासाठी थेट फलंदाजांना जबाबदार धरले. तो म्हणाला, ” फलंदाजी निराशाजनक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत लोक नेहमीच वेगवान आणि उसळीबद्दल बोलतात. यजमान गोलंदाजांनी उच्च उंचीचा फायदा घेतला. आमच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. पण आम्हाला फलंदाजीवर काम करावे लागेल, मी खूप निराश आहे

Advertisement
Advertisement

Leave a Reply