Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: KKR ने संघात केला मोठा बदल, ‘हा’ माजी खेळाडू दिसणार मुख्य भूमिकेत

 मुंबई –  2021च्या आयपीएल (IPL2021) उपविजेत्या संघ असलेला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आपल्या संघात मोठा बद्दल केला आहे. त्यांनी भारताचा माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) याला आपल्या संघाचा नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. शुक्रवारी आपल्या ट्विटर हँडलवरून यांची कोलकत्ताने माहिती दिली.(IPL 2022: KKR made a big change in the team, ‘this’ former player will be seen in the lead role)
अरुणच्या नियुक्तीची घोषणा करताना, केकेआरचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी म्हैसूर म्हणाले, आम्ही भरत अरुण सारखा दिग्गज गोलंदाजी प्रशिक्षक आमच्या संघात आल्याने आम्ही खूप उत्साहित आहेत. ते प्रचंड अनुभव आणि कौशल्यासह KKR मध्ये येणार. नाइट रायडर्स कुटुंबात त्याचे स्वागत,आम्हाला आनंद होत आहे.
भरत अरुण हे टी ट्वेंटी विश्व कप 2021 पर्यंत भारतीय संघाबरोबर काम करत होते. माञ विश्वकपानंतर भारतीय संघाचा माजी हेड कोच रवी शास्त्री यांना भारतीय संघाबरोबर बीसीसीआयने पुढे काम करण्याची संधी न दिल्याने भरत अरुणने देखील पुन्हा गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला नव्हता.
मागच्या काही दिवसांपूर्वी कोलकत्ता आपल्या नवीन कर्णधारसाठी भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर कडे पाहत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यामुळे फरवरी महिन्यात होणाऱ्या मेगा लीलावामध्ये ते श्रेयस अय्यरला आपल्याला संघात घेण्यास इच्छुक असल्याची देखील माहिती समोर आली आहे. बंगलोरमध्ये येत्या 13 आणि 14 फरवरी रोजी मेगा लिलाव होणार आहे.(IPL 2022: KKR made a big change in the team, ‘this’ former player will be seen in the lead role)
Advertisement

Leave a Reply