Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून .. ‘या’ स्टार खेळाडूचा ऑस्ट्रेलियन सरकारने दुसऱ्यांदा केला व्हिसा रद्द

 मुंबई –  सुपर स्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा (Novak Djokovic) व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने (Australian government) जनहितार्थ दुसऱ्यांदा रद्द केला आहे. दुसऱ्यांदा व्हिसा रद्द झाल्याने त्याचे ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये खेळण्याचे स्वप्न  भंग झाले आहे.  ऑस्ट्रेलिया ओपन ही स्पर्धा 9 जानेवारीपासून सुरू झाली असून ती 30 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी जोकोविच थेट पात्र ठरला होता. जर जोकोविच ही स्पर्धा खेळला असता तर त्याला 21वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी प्राप्त झाली असती.( Therefore, the Australian government revoked the visa of ‘this’ star player for the second time)
त्याचा दुसऱ्यांदा व्हिसा रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया सरकार त्याला तत्काळ देशाबाहेर पाठवणार का आणखी काही दिवस देशात राहण्याची संधी देणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार जोकोविच अजूनही ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ शकतो.
काही दिसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता आणि या निर्णयाला त्याने न्यायालयात आव्हान दिले होते. हा खटला जोकोविचने  जिंकल्याने ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचे सर्व कागदपत्र त्याला परत केले होते. त्यानंतर त्याचा ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये खेळण्याचा मार्ग ही मोकळा झाला होता. मात्र आता त्याचा पुन्हा व्हिसा रद्द झाल्याने  ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याच्या आशा संपल्या आहेत.
प्रकरण काय
जोकोविचने आपल्या वैद्यकीय समस्यांमुळे अद्याप कोरोना लस घेतलेली नाही. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये लसीबाबतचे नियम खूप कडक करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्यासाठी त्यांनी आपल्या वैद्यकीय समस्याच्या दाखल देत लसीविना खेळण्याची परवानगी मागितली होती. मात्र जेव्हा तो ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला तेव्हा त्याला वैद्यकीय समस्यांचे पुरावे मागण्यात आले. तेव्हा त्यांच्या वतीने सांगण्यात आले की, 16 डिसेंबर रोजी मला कोरोना झाला होता. अशा स्थितीत मी लस घेऊ शकत नाही. यानंतर त्याला विमानतळावरच थांबवण्यात आले आणि त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला.
Advertisement

Leave a Reply