Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Under-19 World Cup: तरच भारत होणार विश्वविजेता; पहा कुठे पाहता येतील यंग ब्रिगेडचे सामने

  मुंबई –  आयसीसीच्या 14 व्या अंडर-19 विश्वचषक (Under-19 World Cup) स्पर्धेला शुक्रवार, 14 जानेवारीपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच कॅरेबियन भूमीवर आयोजित होत आहे. या स्पर्धेत भारतासह एकूण 16 संघ सहभागी होत असून चार वेगवेगळ्या ठिकाणी 48 सामने खेळवले जाणार आहेत. चार वेळचा चॅम्पियन असणारा भारतीय संघ 15 जानेवारी रोजी गयाना येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहे.(Under-19 World Cup: Will India win the World Cup for the fifth time? Find out where the matches can be watched)
कोरोना महामारीच्या काळात प्रथमच कॅरेबियन भूमीवर होत असलेल्या या स्पर्धेत संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताला ब गटात तर ऑस्ट्रेलियाला ड गटात ठेवण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी भारताचा पराभव करून प्रथमच अंडर-19 चे विजेतेपद पटकावणारा बांगलादेश अ गटात आहे. दोन वेळा विजेते पाकिस्तानसह अफगाणिस्तान सी गटात आहेत. व्हिसा समस्यांमुळे अफगाणिस्तानचा संघ येथे उशिरा पोहोचला असून सराव सामने खेळण्यापासून वंचित राहिला आहे.

स्पर्धेत आतापर्यंत बायो बबलचे उल्लंघन झाले नाही माञ पाकिस्तान आणि झिम्बाब्वेच्या संघांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली होती. न्यूझीलंडने त्यांच्या पृथक्करण नियमांमुळे स्पर्धेतून माघार घेतली असून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला.  या स्पर्धेचा अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी अँटिग्वाच्या नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे.
सामने कुठे पाहू शकतात ?
ICC अंडर-19 विश्वचषक 2022 स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर  ऑनलाईन लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Loading...
Advertisement
Advertisement

Leave a Reply