Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pro Kabaddi League: आज भिडणार जयपूर आणि पटना, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई –  प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) सीझन 8 च्या 53 व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) सामना शुक्रवारी पाटणा पायरेट्सशी (Patna Pirates) बंगळुरू येथील शेरेटन ग्रँड व्हाइटफील्ड येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे.  जो तुम्ही Star Sports Networks आणि Hotstar वर थेट पाहू शकतात.

Advertisement

जयपूर पिंक पँथर्सने 8 पैकी चार सामने जिंकले आहेत आणि फक्त चार गमावले आहेत. तर दुसरीकडे  पटना पायरेट्सचा उत्कृष्ट फॉर्म या हंगामातही कायम आहे.  त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि फक्त एक सामना गमावला आहे.  प्रशांत रायच्या नेतृत्वाखाली पाटणा पायरेट्स संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे.
प्रो कबड्डी लीगचा सर्वात यशस्वी संघ असणारापाटणा पायरेट्स या मोसमात देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, सुरुवातीला गती गमावल्यानंतर, पटनाने विजयी लय पकडली आणि सलग सहा सामनेपासून  अपराजित आहे. गेल्या 6 सामन्यांमध्ये संघाने 5 सामने जिंकले आहे तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. संघाच्या बचावा सोबत रेड टाकणारा विभागही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मोनू गोयत, प्रशांत राय आणि सचिन तन्वर हे संघाच्या चढाईत गोल करत आहेत, तर मोहम्मदरेझा छायानेह, नीरज कुमार आणि सुनील कुमार बचावात गुण मिळवत आहेत.

Loading...
Advertisement

प्रो कबड्डीच्या इतिहासात दोन्ही संघ 14 वेळा आमनेसामने आले आहेत. पाटणा पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सचा 9 सामन्यात पराभव केला आहे, तर पँथर्सने 6 वेळा विजय मिळवला आहे. गेल्या मोसमात जयपूरचा संघ पाटणा विरुद्ध दोन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरला होता. तर आज होणाऱ्या सामन्यात जयपूरचा तोच पुन्हा दिसणार का हे पाहावे लागेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply