सहा वर्षानंतर आयपीएल मध्ये दिसणार ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ वेगवान गोलंदाज
मुबई – ऑस्ट्रेलियाचा (Australia) दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (mitchell starc) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. तो पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये खेळताना दिसणार आहे.या बद्दल स्वतः मिचेल स्टार्कने महिती दिली आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की आयपीएल च्या पुढच्या हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलाव मध्ये मी माझा नाव देण्याचा विचार करत आहे. जर स्टार्कने आपला नाव मेगा लिलावमध्ये टाकला तर त्याच्यामागे आयपीएलचे दहा संघ जाणार हे मात्र निश्चित आहे.
स्टार्कने आता पर्यंत आयपीएलचे दोन सीजन खेळले आहे. 2014 आणि 2015 मध्ये विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील त्याने रॉयल चॅलेंजर बंगलोर या संघाकडून काही सामने खेळले होते. मात्र तेव्हापासून तो या लीगपासून दूर राहिला आहे.
मुलाखतीमध्ये स्टार्कने म्हटले की मी अद्याप कागदपत्रे पूर्ण केलेली नाहीत. यासाठी माझ्याकडे दोन दिवस आहेत. प्रशिक्षणापूर्वी मी याचा विचार करेन. यावर निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे आणखी काही दिवस आहेत. वेळापत्रक काहीही असो, आयपीएलसाठी नामकरण निश्चितच माझ्या मनात आहे.
पुढे तो म्हणाला मी सहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ आयपीएल खेळलो नाही. आगामी T20 विश्वचषक स्पर्धेची तयारी पाहता, मला वाटते की आयपीएल 2022 मध्ये खेळणे हा एक चांगला पर्याय असेल. त्यामुळेच मी खेळण्याचा विचार करत आहे. तर मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. माञ सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता हा मेगा लिलाव पुढे देखील जाऊ शकते