IPL 2022 ; तर श्रेयस अय्यर होणार किंग खानच्या संघचा कर्णधार
मुंबई – पुढच्या महिन्यात आयपीएल 2022 साठी (IPL) मोठा लिलाव होणार आहे. यासाठी प्रत्येक संघाने आप आपली तयारी सुरु केली आहे. या लिलावामध्ये सहा संघ आपल्या संघासाठी कर्णधार शोधणार आहे. या संघात बॉलीवूड किंग खान शाहरुख खान चा संघ कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) देखील समावेश आहे. त्यामुळेच कोलकाता संघ आपला पुढचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) पाहत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोराने होत आहे.
दिल्लीचा माजी कर्णधार म्हणून अय्यरकडे मोठा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने २०२० मध्ये अंतिम फेरी गाठली होती. कोलकात्याचा संघ अशा अनुभवी कर्णधाराच्या शोधात असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच कोलकाता संघचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन परदेशी खेळाडू होता मागच्या हंगामात त्याचा खराब फॉर्म असताना देखील त्याला संघात स्थान देण्यात येत होता त्यामुळे संघाला इतर कोणत्याही परदेशी खेळाडूला आजमावता आले नाही. म्हणून यावेळी संघ भारतीय कर्णधार सोबत जाणार असल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे श्रेयस अय्यरलाही आयपीएलमध्ये कर्णधारपद हवे आहे. त्याची नजर टीम इंडियाच्या कर्णधारपदावर आहे. त्यांच्यासाठी कोलकातासारखा मोठा संघ चांगला पर्याय आहे. या संघाशी शाहरुख खानचे नाव जोडले गेले आहे. तो संघाचा मालक आहे. यामुळे सर्वांच्या नजरा कोलकाता फ्रँचायझीकडे लागल्या आहेत. तिथे कर्णधार बनून अय्यरने चांगली कामगिरी केली तर तो पुन्हा टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील होईल. त्याचबरोबर मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर कोलकाता संघात महत्त्वाची भूमिका बजावतो.
नायर हे या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. संघाचा मुख्य प्रशिक्षक न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम असू शकतो, पण नायरचा संघ व्यवस्थापनात मोठा दर्जा आहे. फ्रँचायझीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्याचा सहभाग असतो. नायरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांच्याशी चांगले संबंध आहेत. श्रेयस अय्यर मूळचा मुंबईचा असून त्याची नायरशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे कोलकाता आपला पुढील कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला पसंती देऊ शकते.