Take a fresh look at your lifestyle.

कोलकाता नाईट रायडर्सने धोनीला केला ट्रोल तर रवींद्र जडेजाने दिला हा चोख प्रत्युत्तर..

मुंबई –  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील चौथी कसोटी सामना नुकताच पार पडला. या रोमांचक सामन्‍यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी सामन्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या दोन षटकांचा सामना करत सामना ड्रॉ केला. यावरून कोलकाता नाईट रायडर्स भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोशल मीडियावर ट्रोल केला आहे. त्यानंतर स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने कोलकाताला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

कोलकाताने आपल्या ट्विटरच्या अकाउंट वर एक फोटो शेअर केलाय त्या फोटोमध्ये सिडनी कसोटीचे चित्र आहे.ज्यात नऊ क्षेत्ररक्षक फलंदाजाला घेरले आहेत. त्याच वेळी, खालील चित्रात, धोनीभोवती कोलकाता संघाचे पाच क्षेत्ररक्षक आहेत. याफोटोमध्ये धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी फलंदाजी करत आहेत.

Advertisement

कोलकाताने शेअर केलेल्या छायाचित्रात पियुष चावला गोलंदाजी करत आहे. कोलकात्याच्या संघाला दोनदा चॅम्पियन बनवणाऱ्या गौतम गंभीरने 2016 मध्ये धोनी क्रीजवर आल्यानंतर आक्रमक क्षेत्ररक्षण केले होते.

Advertisement

यानंतर स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने( ravindra jadeja) कोलकत्ता संघाला उत्तर दिला आहे. फोटो शेअर करताना कोलकाताने लिहिले – जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये एक उत्तम प्लॅन तुम्हाला टी-20 मास्टरस्ट्रोकची आठवण करून देतो. यावर जडेजाने उत्तर दिले आणि लिहिले – हा मास्टरस्ट्रोक नाही तर फक्त दिखावा आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply