Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आता खेळाडूंनाही द्यावी लागणार नोटीस; ‘या’ देशातील क्रिकेटचे नियम आधिक कठोर; जाणून घ्या..

मुंबई : सध्या श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये सारे काही व्यवस्थित सुरू आहे, असे आजिबात नाही. भारतीय क्रिकेटमध्ये जसा कर्णधारपदाच्या मुद्द्यावर वाद सुरू आहे. तसा वाद येथे नाही. मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या फिटनेसबाबत काही नियम जारी केले होते. त्यानंतर येथील काही खेळाडूंनी थेट निवृत्ती जाहीर करुन टाकली.

Advertisement

भानुका राजपक्षे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर दनुष्का गुणतिलका याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. खेळाडूंच्या या निर्णयामुळे श्रीलंका बोर्डाच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता बोर्डाने खेळाडूंच्या निवृत्तीसंबंधी काही नवीन नियम जारी केले आहेत. खेळाडूंपैकी ज्यांनी कुणी निवृत्ती जाहीर केली आहे किंवा जे कुणी निवृत्ती घेण्याचा विचार करत आहेत, अशा खेळाडूंसाठी बोर्डाने काही कठोर नियम तयार केले आहेत. याबाबत बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक तयार केले असून त्याद्वारे या नियमांची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय खेळाडूस जर निवृत्ती जाहीर करायची असेल तर त्यांना तीन महिने याबद्दल बोर्डास नोटीस देणे गरजेचे राहणार आहे. क्रिकेटपटू नोटीस कालावधीनंतरच निवृत्ती घेऊ शकेल.

Loading...
Advertisement

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ज्या निवृत्त खेळाडूंनी 80 टक्के सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले असेल अशाच खेळाडूंना लंका प्रिमियर लीगसारख्या स्पर्धांसाठी पात्र ठरवण्यात येईल. निवृत्ती स्वीकारल्यानंतर अन्य देशांच्या टी 20 आणि इतर फ्रँचायजी लीग क्रिकेट स्पर्धांमध्ये ताबडतोब सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार नाही. निवृत्ती घेतल्यानंतर किमान सहा महिन्यांचा कालावधी पार पडल्यानंतर बोर्डाकडून एनओसी देण्यात येईल. त्यानंतर या खेळाडूंना अन्य देशांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

Advertisement

ऐकावं ते नवलंच की; म्हणून भारतापेक्षा पाकिस्तान, श्रीलंका जास्त हॅपी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply