राहुल द्रविडही नाराज.. पत्रकार परिषदेत दिलेत ‘हे’ महत्वाचे अपडेट; पहा, नेमके काय म्हटलेय द्रविडने
मुंबई : भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर संघावर चौफेर टीका होत आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी ऋषभ पंतवर कडाडून टीका केली आहे. त्याच्यामुळेच संघास मोठे आव्हान देता आले नाही, आणि सामना गमवावा लागला, असेच यावरुन स्पष्ट होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यानंतर आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही पंतच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल द्रविड पत्रकार परिषदेत म्हणाला, की ऋषभ सकारात्मक खेळत आणि खास पद्धतीने फलंदाजी करतो, हे आपल्याला माहित आहे. या पद्धतीने फलंदाजी करून त्याला यश देखील मिळाले आहे. पण, आता आम्ही त्याच्याबरोबर नक्कीच चर्चा करू. त्या पद्धतीचा फटका मारण्याची वेळ आणि सामन्यातील परिस्थितीवर चर्चा होईल. सकारात्मक किंवा आक्रमक पद्धतीने फलंदाजी करू नकोस, असे पंतला कुणीही सांगणार नाही. पण, काही वेळेस वेळेचे भान ठेवणेही गरजेचे असते. एक फलंदाज म्हणून आक्रमक फलंदाजी कधी करायची, हे समजणे आवश्यक आहे, असे द्रविडने सांगितले.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्याने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी होती. मात्र, फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात विराट कोहली नव्हता. तरी देखील काही विजयाची शक्यता दिसत होती. मात्र, संघास विजय मिळवता आला नाही. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना समान संधी राहणार आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करतील.
कसोटी मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 17 जानेवारी पासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही रोहित शर्मा दिसणार नाही. त्याच्या ऐवजी केएल राहुलला कर्णधार केले आहे.
टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार राहुलने दिलीय प्रतिक्रिया; पहा, नेमके काय म्हटलेय