Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार राहुलने दिलीय प्रतिक्रिया; पहा, नेमके काय म्हटलेय

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारताचा कर्णधार केएल राहुल निराश झाला आहे. जोहान्सबर्ग येथील द वॉंडरर्स मैदानावर गुरुवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघास पराभव स्वीकारावा लागला. या मैदानावर 29 वर्षांनंतर भारताचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिला पराभव आहे. पराभवानंतर कर्णधार केएल राहुल म्हणाला की, नाणेफेक जिंकल्यानंतर संघाने पहिल्या डावात आणखी 60 ते 70 रन करायला हवे होते.

Advertisement

सामन्यानंतर केएल राहुल म्हणाला, की ‘नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरलो. आम्ही किमान 60-70 रन आणखी करायला पाहिजे होते. आम्हाला वाटले की 122 रन करणे सोपे नाही. ते येथे काही खास करू शकतात, असा विश्वास संघाला वाटत होता. या मैदानावर फलंदाजी करणेही अवघड होते, पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. शार्दुल ठाकूरसाठी हा एक उत्तम कसोटी सामना होता. त्याने आपल्या कामगिरीने आपल्याला खूप प्रभावित केले आहे. त्याने फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Loading...
Advertisement

दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग कसोटीत 7 गडी राखून विजय नोंदवत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. कर्णधार डीन एल्गरने नाबाद 96 रन केल्याने दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी भारताविरुद्ध पहिला विजय नोंदवला. विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय संघाने पहिल्या डावात 202 आणि दुसऱ्या डावात 266 रन्स केले, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 229 धावा करत 27 धावांची आघाडी घेतली. आता 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये उभय संघांमधील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना होणार आहे.

Advertisement

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा धक्कादायक पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

Advertisement
Advertisement

Leave a Reply