दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा धक्कादायक पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी
मुंबई : पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र दक्षिण आफ्रिक संघाने शानदार पुनरागमन केले. जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघास पराभवाचा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना सात विकेटने जिंकला. संघाचा कर्णधार डी. एल्गर याने नाबाद 96 रन केले. आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये भारतीय गोलंदाज प्रभावी ठरले होते. मात्र, चौथ्या डावात आफ्रिकेच्या फलंदाजांनी वर्चस्व राखले.
बुधवारप्रमाणे आजही भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. वाँडरर्स मैदानाचा अलीकडच्या काही वर्षातील इतिहास भारताच्या बाजूने आहे, आज जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे भारतीय गोलंदाज प्रभावी ठरतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तसे काहीच घडले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना कुठलीही दाद दिली नाही व शानदार विजयाची नोंद केली. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली. बुमराहने तर 70 रन दिल्या. अन्य गोलंदाजांनाही विशेष काही करता आले नाही. त्याचा फटका संघास बसला. आणि पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी कायम राखता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्याने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी होती. मात्र, फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात विराट कोहली नव्हता. तरी देखील काही विजयाची शक्यता दिसत होती. मात्र, संघास विजय मिळवता आला नाही. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे.
भारतीय संघास मोठा धक्का.. दुसऱ्या कसोटीतून विराट बाहेर; जाणून घ्या, काय आहे कारण