अर्र.. खराब कामगिरी ठरणार डोकेदुखी.. ‘या’ फलंदाजाच्या अडचणी वाढणार; संघाबाहेर होण्याचीही शक्यता..
मुंबई : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. पहिली कसोटी जिंकून भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच अशी चर्चा होती की या सामन्यातही संघाचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले तर ते संघाबाहेर होतील हे नक्की. पण संघात आणखी एक फलंदाज आहे जो या फलंदाजांआधी संघाबाहेर होण्याची शक्यता आहे.
होय, टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज मयंक अग्रवाल.
मयंकची कामगिरी सातत्याने खराब राहिली आहे आणि तो लवकर आऊट झाल्यामुळे संघाची फलंदाजी प्रत्येक वेळी दडपणाखाली येते. कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 26 रन्स करणाऱ्या मयंकला दुसऱ्या डावातही केवळ 23 रन्स करता आले. टीम इंडियाला दमदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी मयंककडे होती, पण तो फ्लॉप ठरला. आता मयंकची संघातून बाहेर होण्याची वेळ आली आहे.
जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावातही मयंक अग्रवाल अपयशी ठरला होता आणि या कारणास्तव तो आता तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातून बाद होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय संघात एक खेळाडू आहे जो मयंकच्या जागी सलामीवीर म्हणून येऊ शकतो. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 11 जानेवारी 2022 पासून केपटाऊनमध्ये होणार आहे. त्यामुळे युवा फलंदाज प्रियांक पांचाळ या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकेल.
प्रियांक पांचाळने अलीकडेच दक्षिण आफ्रिका-ए संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत चमकदार कामगिरी केली होती. ज्यासाठी त्याला टीम इंडियामध्ये निवड म्हणून बक्षीस मिळाले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यामुळे प्रियांक पांचाळ कसोटी संघात सामील झाला होता. आता हा फलंदाज पुढील कसोटीत टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो.
कोरोनाने पुन्हा दिलाय धक्का.. बीसीसीआयने आता ‘या’ मोठ्या स्पर्धांबाबत घेतलाय ‘हा’ निर्णय