Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय संघास मोठा धक्का.. दुसऱ्या कसोटीतून विराट बाहेर; जाणून घ्या, काय आहे कारण

मुंबई : जोहान्सबर्ग कसोटीत भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी के.एल. राहुल यास कर्णगधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. के.एल. राहुलने सांगितले की, विराट कोहली दुखापतीमुळे या कसोटीतू बाहेर पडला आहे. मात्र, केपटाऊनमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत कोहली सहभागी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

या कसोटीतून बाहेर पडल्याने विराट कोहलीच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. या कसोटी मालिकेतून रोहित शर्माने सुद्धा दुखापतीमुळेच माघार घेतली होती. त्यानंतर आता विराटने सुद्धा माघार घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याआधी पहिल्या कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला होता. आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरुवात झाली आहे. त्याआधीच टीम इंडियास हा धक्का बसला आहे.

Advertisement

विराट कोहली दुसऱ्या कसोटीत नसणे टीम इंडियासाठी मोठ्या नुकसानापेक्षा कमी नाही. वास्तविक, या मागे त्याचा जोहान्सबर्गमधील विक्रम आहे. विराट कोहली हा दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक रन्स करणारा भारतीय फलंदाज आहे. तसेच, जॉन रीडनंतर परदेशात सर्वाधिक रन्स करणारा दुसरा फलंदाज आहे. जोहान्सबर्गमध्ये विराट कोहलीने 310 रन्स केले आहेत. त्याचबरोबर जॉन रीडच्या नावावर 316 रन्स आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी पहिल्या कसोटीत टीम इंडियाने पहिल्यांदाच विजय मिळवला होता. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्यांना या मैदानावर मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यावेळी टीम इंडियाने उलथापालथ केली. सेंच्युरियन येथे झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई संघ आहे. पाकिस्तान, श्रीलंकेलाही सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवता आलेले नाही. मात्र, टीम इंडियाने आपल्या उत्कृष्ट सलामीवीर आणि वेगवान गोलंदाजांच्या जोरावर हा पराक्रम केला. भारताने दक्षिण आफ्रिकेतील केवळ चौथा कसोटी सामना जिंकला आहे, त्यापैकी दोन विजय विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळाले आहेत.

Advertisement

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ‘विराट’ विजय; पहिल्या सामन्यात केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव

Advertisement
Advertisement

Leave a Reply