Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राहुल द्रविडने विराटबद्दल केलीय मोठी भविष्यवाणी, पहा, नेमके काय म्हणालाय द्रविड..

मुंबई : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक केलेले नाही. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सलग दोन वर्षे शतक न करण्याची ही पहिलीच वेळ आहे, पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला त्याबद्दल फारसे काही वाटत नाही. विराट आपल्या फलंदाजीचा फॉर्म बदलण्याच्या मार्गावर आहे, असा अंदाज द्रविडने व्यक्त केला. 2020 च्या सुरुवातीपासून 14 कसोटी सामन्यांमध्ये शतक न करता त्याची सरासरी 26.08 आहे.

Advertisement

द्रविड म्हणाला, की ‘जरी त्याने चांगली फलंदाजी केली आणि तो सुरुवात मोठ्या धावसंख्येमध्ये बदलू शकला नाही, तरी मला वाटते की त्याच्या फलंदाजीतून चांगले रन्स येणार आहेत. पुढच्या सामन्यात हे घडणार नाही, मला आशा आहे की पुढच्या सामन्यात ते घडेल, पण मला वाटते एकदा त्याच्यासारख्या फलंदाजाने चांगले रन्स केले की मग पुढे काळजीचे कारण राहत नाही. मला वाटते, गेल्या दोन आठवड्यापासून जे काही सुरू आहे, त्याने स्वत:ला सांभाळले आणि क्रिकेटचे उत्तम नेतृत्व केले.

Loading...
Advertisement

2020 च्या सुरुवातीपासून चेतेश्वर पुजाराची सरासरी 26.21 आहे आणि त्याने या कालावधीत फक्त सात अर्धशतके केली आहेत. जेव्हा द्रविडला पुजाराच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, कधीकधी फलंदाज मोठी धावसंख्या न करता कठीण परिस्थितीत चांगली फलंदाजी करतात. द्रविड म्हणाला, ‘मला वाटते की तो सर्वोत्तम कामगिरी करत आहे आणि काही वेळा नक्कीच त्याला अधिक रन्स करायला आवडेल. त्याच्या 10 वर्षांच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत त्याने खूप यश मिळवले आहे, त्यामुळे सध्या तो कुठे पोहोचला आहे आणि त्याने कोणत्या प्रकारचे यश मिळवले आहे हे त्याला माहीत आहे.

Advertisement

टीम इंडियातील ‘तो’ वाद आणखी वाढणार; आता निवड समितीच्या प्रमुखांनी केलाय मोठा खुलासा

Advertisement
Advertisement

Leave a Reply