एकदिवसीय मालिकेतून रोहित शर्माची माघार; निवड समितीने सांगितलेय खरे कारण; जाणून घ्या..
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या संघात रोहित शर्माला मात्र संधी मिळाली नाही. रोहित अजून पूर्ण बरा नसल्याने एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा विचार केला नाही, असे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही रोहितने कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतूनही माघार घेतल्याने विराट कोहली बरोबरचा वाद यास कारणीभूत असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. या मुद्द्यावर आता निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
चेतन शर्मा म्हणाले, की विराट आणि रोहित या दोघांमध्ये कोणताही वाद नाही. त्यामुळेच मी सांगतोय की अफवांवर विश्वास ठेऊ नका. आपण सर्वप्रथम क्रिकेटपटू आहोत आणि निवड समिती सदस्य नंतर. दोघांमध्ये चांगला ताळमेळ आहे. संघाच्या भविष्याच्या दृष्टीने दोघे नेहमीच संवाद साधत असतात. मात्र, या दोघांमध्ये काहीतरी वाद आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता 2021 बरोबर या वादाच्या चर्चा सोडून द्या, चांगला संघ तयार करण्यासाठी चर्चा करा, असे शर्मा म्हणाले. याआधी शर्मा यांनी विराटकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या निर्णयावरही मत व्यक्त केले होते.
या मुद्द्यावर त्यांनी सांगितले होते, की मर्यादीत ओव्हरच्या सामन्यांसाठी एकच कर्णधार असावा, असे निवड समितीचे मत होते. कसोटी संघाची घोषणा करतानाच हा निर्णय जाहीर केला. कारण, कसोटी मालिका सुरू असतानाच हा निर्णय जाहीर केला असता तर त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला असता. विराटकडून टी 20 संघाचे कर्णधारपद सोडू नये, असे त्यास आम्ही सांगितले होते, असेही शर्मा यांनी सांगितले.
टीम इंडियातील ‘तो’ वाद आणखी वाढणार; आता निवड समितीच्या प्रमुखांनी केलाय मोठा खुलासा