Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जगातील 11 बेस्ट खेळाडू्ंच्या यादीतून विराट बाहेर; ‘या’ चार भारतीय खेळाडूंचा केलाय समावेश

मुंबई : 2021 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगले गेले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने जगातील अशा देशांमध्येही मालिका जिंकली जिथे संघाने कधीही चमत्कार केला नव्हता. त्याचबरोबर खेळाडूंची कामगिरीही उत्कृष्ट होती. दरम्यान, वर्षाच्या शेवटच्या दिवशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑफ स्पिनर आर. अश्विन यांच्यासह चार भारतीय खेळाडूंचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वर्षातील सर्वोत्तम 11 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. रोहित आणि अश्विनशिवाय ऋषभ पंत आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल यांचाही समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश नाही.

Advertisement

श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेसह रोहितला सलामीवीर म्हणून ठेवण्यात आले आहे. मार्नस लाबुशेनला तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्याच्यानंतर जो रूट आणि पंत हा खेळाडू आहे. रोहितने दमदार कामगिरी करत यावर्षी रूटनंतर सर्वाधिक रन्स केले आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या पंतला विकेटकीपर बनवण्यात आले आहे. या वर्षी जो रुटने सर्वाधिक रन्स केले आणि त्यालाही या संघात संधी देण्यात आली आहे.

Loading...
Advertisement

अश्विन आणि अक्षर यांना फिरकी विभागात संधी देण्यात आला आहे. अश्विनने यावर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट घेतल्या. तर अक्षरने चांगली कामगिरी करून संघात आपली दावेदारी पक्की केली आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या घडीला भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहला सुद्धा या संघात क्रमांक मिळालेला नाही.

Advertisement

टीम इंडियातील वाद काही मिटेना.. आता ‘या’ माजी खेळाडूने दिलाय विराटला पाठिंबा; पहा, काय सुरू आहे क्रिकेट विश्वात

Advertisement
Advertisement

Leave a Reply