Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

… ‘त्या’ खेळाडूंकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते त्रासदायक; फलंदाजीत आहे जबरदस्त कामगिरी

मुंबई : भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सध्या सुरू आहे. या दौऱ्यात निवड समितीने संघाची निवड करताना अनेक दर्जेदार खेळाडूंचा अद्याप विचार केलेला नाही. यामध्ये दोन खेळाडू असे आहेत, की ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे संघ व्यवस्थापन भविष्यात कदाचित जड जाऊ शकते. या दोन्ही खेळाडूंमध्ये स्वतःच्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता आहे.

Advertisement

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघातील पृथ्वी शॉ धडाकेबाज फलंदाजी करतो. रोहितप्रमाणेच शॉनेही पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक केले आहे. शॉ सुरुवातीला वेगवान फलंदाजी करून गोलंदाजांवर दबाव आणण्यासाठी ओळखला जातो. जेव्हा शॉ त्याच्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करू शकतो. पृथ्वी शॉच्या फलंदाजीत रोहित शर्माची छाप दिसून येते. रोहितच्या अनुपस्थितीत शॉ सलामीची जबाबदारी सांभाळू शकतो.

Advertisement

शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना बऱ्याच वेळा संधी मिळाली आहे. त्यातुलनेत निवडकर्ते पृथ्वी शॉकडे मात्र दुर्लक्षच करत आहेत. खराब फॉर्ममुळे शॉला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. पण आपल्या क्षमतेच्या जोरावर या खेळाडूने क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे.

Loading...
Advertisement

आरसीबी संघातील के. एस. भरत त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये भरपूर रन केले आहेत. आयपीएल 2021 मध्ये, हा खेळाडू RCB साठी सामना विजेता म्हणून उदयास आला. IPL 2021 च्या 8 सामन्यात भरतने 191 रन्स केले आहेत. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही.

Advertisement

टीम इंडियातील वाद काही मिटेना.. आता ‘या’ माजी खेळाडूने दिलाय विराटला पाठिंबा; पहा, काय सुरू आहे क्रिकेट विश्वात

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply