Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियातील वाद काही मिटेना.. आता ‘या’ माजी खेळाडूने दिलाय विराटला पाठिंबा; पहा, काय सुरू आहे क्रिकेट विश्वात

मुंबई : कर्णधार पदाच्या मुद्द्यावर क्रिकेट संघात सुरू असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. या मुद्द्यावर अनेक क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता प्रथमच भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या महिनाभरापासून हा वाद सुरू आहे. मात्र, आतापर्यंत शास्त्री यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. आता मात्र, त्यांनी मत व्यक्त केले आहे. शास्त्री यांनी या वादात विराट कोहलीची बाजू घेतली असून बीसीसीआयला महत्वाचा उपदेश दिला आहे.

Advertisement

माझ्या मते विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील वाद चांगल्या पद्धतीने सोडवता आला असता. विराट कोहलीनं या विषयावर त्याची बाजू मांडली आहे. आता बोर्डाने (सौरव गांगुली) त्यांची बाजू मांडण्याची गरज आहे.चांगल्या चर्चेतून परिस्थिती आणखी चांगली राहिली असती,’ असे शास्त्राींनी स्पष्ट केले.

Advertisement

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरुन हटवण्याबाबत आपल्याला फक्त दीड तास आधी सांगण्यात आले, असा दावा विराटने केला. त्याचबरोबर टी 20 टीमचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती आपल्याला कुणीही केली नव्हती, असे सांगत या विषयावर सौरव गांगुली यांनी केलेला दावा फेटाळून लावला.

Loading...
Advertisement

रवी शास्त्रींनी यावेळी रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा कर्णधार करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ‘रोहित शर्मा आता टी 20 टीमचा कॅप्टन आहे. एकदिवसीय संघाचा कॅप्टनही तोच हवा. विराटने टी 20 टीमचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी रोहितचा कॅप्टन होण्याचा मार्ग मोकळा झाला.’ असे शास्त्रींनी सांगितले. त्याच बरोबर विराट कोहलीनेच टेस्ट टीमचा कॅप्टन रहवे, तो टेस्टमधील सर्वश्रेष्ठ कॅप्टन आहे, असेही शास्त्रींनी स्पष्ट केले.

Advertisement

… म्हणून गांगुलीवर भडकलाय ‘हा’ माजी क्रिकेटपटू; ‘त्या’ वादावर दिलेय महत्वाचे स्पष्टीकरण

Advertisement
Advertisement

Leave a Reply