Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कसोटी आधीच आलीय मोठी बातमी; भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांना बसणार फटका..

नवी दिल्ली : भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होण्याआधीच क्रिकेट चाहत्यांना टेन्शन देणारी बातमी आली आहे. आधीच ओमिक्रॉनच्या भितीने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता नैसर्गिक संकट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे होणाऱ्या कसोटी सामन्यातील पहिले दोन दिवस पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. येथील हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement

येथे 26 आणि 27 डिसेंबर रोजी जोरदार पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर अन्य दिवशीही कमी प्रमाणात पाऊस होईल असे सांगितले आहे. त्यामुळे पहिलाच कसोटी सामना संकटात सापडला आहे.

Advertisement

या सामन्यांसाठी भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. यंदा रोहित शर्मा संघात नाही. त्याच्या ऐवजी प्रियांक पांचाळ यास संघात घेतले आहे. दुखापतीचे कारण देत रोहितने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. प्रत्यक्षात कारण मात्र वेगळेच असल्याची चर्चा आहे. भारतीय संघात सध्या कर्णधारपदाच्या मुद्द्यावर जोरदार वाद सुरू आहेत. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन विराट कोहलीस काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद वाढला आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद मात्र विराटकडे आहे. कदाचित या कारणामुळे रोहितने दौऱ्यातून माघार घेतली असावी, अशीही चर्चा आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचे संक्रमण वेगाने वाढत आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने काही निर्णय घेतले आहेत. क्रिकेट सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहेत. प्रेक्षकांना परवानगी दिलेली नाही. आधी परवानगी होती, मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

Advertisement

दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा मोठा निर्णय; कोरोनामुळे ‘त्या’ क्रिकेट सामन्यांबाबत घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply