मुंबई : एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल्यानंतर विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. विराट कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे विधान खोटे ठरविले, ज्यात त्याने म्हटले होते की, मी विराट कोहलीला टी-20 चे कर्णधारपद सोडण्यास मनाई केली होती. कोहलीने खुलासा केला की, त्याला टी-20 कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही रोखले नाही. त्यामुळे आता गांगुलीने खोटे का सांगितले म्हणून प्रश्न उपस्थित होत आहेत.
विराट कोहली टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपण कोणतेही जाहीर वक्तव्य करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विराट कोहलीच्या वादळी पत्रकार परिषदेने हैराण झालेले बीसीसीआय या संकटाचा सामना करण्यासाठी पर्यायांचा विचार करत आहे. मैदानाबाहेरील नाट्यमय घडामोडींनी महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी संघाचे लक्ष विचलित होणार नाही याचीही बीसीसीआय काळजी घेत आहे.
भारतीय कसोटी कर्णधार कोहलीने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मला कधीही टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्यास सांगितले गेले नाही. त्याचे हे विधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या वक्तव्याच्या विरोधात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जे घडले त्यावर बीसीसीआयमधील कोणीही खूश नाही. परंतु, त्यांना समजते की त्यांच्याकडून कोणतीही तीव्र प्रतिक्रिया या प्रकरणाचे त्वरित निराकरण करण्यासाठी हानिकारक असू शकते. कोहली दक्षिण आफ्रिकेत पोहोचला तर कोलकाता येथे बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले की ते कोणतेही सार्वजनिक विधान करणार नाहीत.
गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यात बैठक घेतली गेली. या बैठकीत कोणीही पत्रकार परिषद घेणार नाही किंवा प्रेस नोट जारी करणार नाही, असा एकत्रितपणे निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, या संवेदनशील प्रकरणाला कसे हाताळावे याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यात आले. कारण आता कसोटी मालिका होणार आहे याची बीसीसीआयला जाणीव आहे. त्यामुळे गडबडीत घेतलेला कोणताही निर्णय किंवा विधान संघाच्या मनोबलावर परिणाम करू शकते.
आता सौरव गांगुलीनेही ‘त्या’ मुद्द्यावर दिलीय प्रतिक्रिया; विराटलाही दिलाय ‘हा’ इशारा..