Take a fresh look at your lifestyle.

गौतम गंभीर म्हणाला, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघात स्थान मिळवू शकणार नाही हा खेळाडू

मुंबई : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणे भारतीय संघात स्थान मिळवू शकणार नाही, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने म्हटले आहे. रहाणे गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असून गेल्या अनेक सामन्यांमधील त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले. अय्यरला आफ्रिका दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे.

Advertisement

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावल्यानंतर रहाणेने केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या २९ डावांमध्ये त्याची सरासरी २५ च्या जवळपास आहे. त्याच वेळी, 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या 12 कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी 19.57 आहे. सध्या तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे, मात्र गेल्या काही वर्षांत त्याची कामगिरी घसरली आहे. 2014 मध्ये त्याची सरासरी 34.62 होती आणि 2018 मध्ये ती 30.66 पर्यंत घसरली. तथापि 2019 मध्ये त्याने आठ सामन्यांत 71.33 च्या सरासरीने धावा केल्या.

Advertisement

रहाणेच्या कामगिरीबद्दल बोलताना गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “मी असे म्हणू शकतो की रहाणे भारताच्या सलामीच्या संघात नाही. खरे सांगायचे तर, मला वाटते की रहाणेला भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण जाईल. तुमच्याकडे श्रेयस आहे. त्याची अलीकडची कामगिरी लक्षात घेता त्याला वगळणे भारताच्या कर्णधाराला खूप कठीण जाईल. हनुमा विहारीनेही चांगली कामगिरी केली आहे.
भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी रहाणेचे समर्थन करताना म्हटले की, त्याला परदेशी परिस्थितीत खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि भारताने त्याचा संघात समावेश केला पाहिजे.

Advertisement

तो म्हणाला, “दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात रहाणेची निवड झाली असून, त्यालाही संघात स्थान मिळायला हवे. कारण तिथे तुम्हाला अनुभवाची गरज आहे. त्याला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळेल का, ही मोठी गोष्ट आहे. मालिकेपूर्वी खेळलेला सामना खूप महत्त्वाचा झाला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply