Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियाचा आफ्रिका दौरा डळमळीत; ‘त्या’ कारणामुळे बीसीसीआयही पडलेय गोंधळात

नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोनाच्या ओमीक्रोन व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरिएंट आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भारतीय संघाचा नियोजित दक्षिण आफ्रिका दौरा संकटात सापडला आहे. बीसीसीआयने हा दौरा निर्धारित वेळापत्रकानुसारच होईल असे सांगितले होते. मात्र, आता सध्याची परिस्थिती पाहता हा दौरा एक आठवडा उशिराने सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेस सांगितले, की दौऱ्याबाबत दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव पाहता आम्ही हा दौरा एक आठवडा उशिराने सुरू करण्याचा विचार करत आहोत. केंद्र सरकारच्या मंजुरी कधी मिळेल याची वाट पाहत आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

जानेवारी महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघा दरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेत तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि चार टी 20 सामने होणार आहेत. भारतीय संघाच्या या दौऱ्यास 17 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे.

Loading...
Advertisement

याआधी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते, की या प्रकरणी मंडळाने केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक मंडळ मग ते बीसीसीआय असो किंवा दुसरे कोणतेही असो, त्यांनी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत अर्ज आल्यास त्यावर सरकार निर्णय घेईल, असे ठाकूर यांनी सांगितले होते.

Advertisement

दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत आलीय मोठी अपडेट; ‘त्या’ प्रश्नाचे बीसीसीआयने दिलेय उत्तर

Advertisement
Advertisement

Leave a Reply