Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

किंग्स पंजाबला दुसरा धक्का; के. एल. राहुलनंतर आणखी एकाने दिलाय राजीनामा; पहा, आयपीएलमध्ये नेमकं काय चाललयं..?

नवी दिल्ली : पुढील वर्षात होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व आठ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. जवळपास सगळ्या संघांनी त्यांचे प्रमुख खेळाडू कायम ठेवले आहेत. मात्र, किंग्स पंजाबच्या बाबतीत असे घडलेले नाही. धडाकेबाज फलंदाज के. एल. राहुल आता पंजाबच्या संघात दिसणार नाही. पंजाब संघासाठी हा मोठा धक्का मानला जात असतानाच आणखी एक धक्का बसला आहे. संघाचे असिस्टंट कोच अँडी फ्लावर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Advertisement

फ्लॉवर यांनी नुकताच राजीनामा पाठवला आहे. त्यांचा हा राजीनामा पंजाबच्या टीमने स्वीकारला आहे. फ्लॉवर आता लखनऊ किंवा अहमदाबाद या दोन नव्या संघांबरोबर दिसतील, असे बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

आयपीएलमधील सर्व संघांनी आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. मात्र, काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, इशान किशन या महत्वाच्या खेळाडूंसह अन्य काही खेळाडूंचा संघात समावेश केलेला नाही. हैदराबाद संघानेही ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला रिटेन केले नाही. तसेही आयपीएल मध्ये वॉर्नरची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. त्यामुळे काही सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे वॉर्नर पुढील आयपीएलमध्ये हैदराबाद संघात नसेल, असे सांगण्यात येत होते. घडलेही तसेच. हैदराबाद संघ व्यवस्थापनाने वॉर्नरला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे पुढील आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर हैदराबाद संघात दिसणार नाही.

Loading...
Advertisement

2022 मधील आयपीएलमध्ये लखनऊ आणि हैदराबाद या दोन नव्या संघांचा समावेश आहे. दोन नवीन संघ आल्याने अनेक नवीन खेळाडू दिसतील.

Advertisement

2022 मध्ये आयपीएल कुठे होणार ?; बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिलेय ‘हे’ उत्तर

Advertisement
Advertisement

Leave a Reply