Take a fresh look at your lifestyle.

भारत- न्यूझीलंड T-20 : कर्णधार रोहित शर्माच्या नावावर अनोखा विक्रम.. काय केले त्याने

मुंबई : भारताचा T-20 कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T-20 क्रिकेटमध्ये एका नवा विक्रम केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये त्याने हा विक्रम केला आहे.

Advertisement

रोहितने T-20 मध्ये 150 षटकार पूर्ण केले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मध्ये त्याने तीन षटकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला. ही कामगिरी करणारा रोहित हा पहिला भारतीय खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने त्याच्यापेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.

Advertisement

गुप्टिलने 107 डावात 161 षटकार मारले आहेत, तर रोहितने 111 डावात 150 षटकार ठोकले आहेत. या सामन्यात रोहितने विराटला ५० हून अधिक धावा काढण्याच्या बाबतीतही मागे टाकले. आता या बाबतीत तो भारताचा अव्वल खेळाडू बनला.

Advertisement

विराटने T-20 क्रिकेटमध्ये 29 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तर रोहितने 30 वेळा अशी कामगिरी केली आहे. मात्र, अर्धशतकं झळकावण्यात विराट अजूनही आघाडीवर आहे. त्याने 29 अर्धशतके झळकावली आहेत, तर रोहितच्या नावावर 26 अर्धशतके आहेत. त्याने T-20 मध्ये चार शतकेही झळकावली आहेत. या कारणामुळे रोहित आघाडीवर आहे.

Advertisement

या सामन्यात रोहित टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनू शकला असता, पण त्याला तसे करता आले नाही. सध्या विराट भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटला मागे सोडण्यासाठी रोहितला या सामन्यात 87 धावा कराव्या लागल्या असत्या  मात्र तो केवळ 56 धावा करू शकला.

Advertisement

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल पहिल्या स्थानावर आहे. त्याने 107 डावात 3248 धावा केल्या आहेत, तर विराटने 87 डावात 3227 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहितच्या नावावर 111 डावात 3197 धावा आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply