Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ पराभवानंतर चेन्नईला बसलाय ‘असा’ जोरदार झटका; पहा, गुणतालिकेत नेमके काय घडलेय

दुबई : आयपीएल मध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्सचा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे चेन्नईला गुणतालिकेत जोरदार झटका बसला आहे. दिल्लीच्या संघाने आता प्रथम क्रमांक मिळवला आहे. चेन्नईचा संघ मागे पडला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नईने चांगली कामगिरी केली आहे. प्ले ऑफमध्ये सुद्धा संघ पोहोचला आहे. मात्र, यावेळेस दिल्लीचा संघ मजबूत ठरत आहे. कालच्या सामन्यात दिल्लीने सर्वच आघाड्यांवर चेन्नईचा पराभव केला.

Advertisement

सामना सुरु होण्यापूर्वी चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघानी 12 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले असले तरी चेन्नईचा रनरेट जास्त होता. त्यामुळे गुणतालिकेत चेन्नईचा संघ आघाडीवर होता. पण आता दिल्लीने चेन्नईचा पराभव केला आहे. 13 सामन्यांपैकी 10 सामने जिंकत 20 गुण मिळवले आहेत. ज्यामुळे दिल्ली आता टॉपवर आहे.

Advertisement

चेन्नई, दिल्ली आणि बंगलोर हे तीन संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाले आहेत. आणखी एक संघ प्ले ऑफमध्ये येईल. मात्र, हा संघ कोणता असले हे अजून निश्चित नाही. आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, त्याची दावेदारी आधिक मजबूत होणार आहे. तसे पाहिले तर मुंबईसाठी परिस्थिती जास्त आव्हानात्मक आहे. कारण, मुंबईला पुढील दोन्ही सामने चांगल्या रनरेटने जिंकावे लागणार आहेत. कारण, संघाचा रनरेट चांगला नाही. त्यामुळे फक्त सामने जिंकून उपयोग होणार नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply