Take a fresh look at your lifestyle.

पंजाबच्या विजयाने ‘असे’ बदललेय प्ले ऑफचे गणित; मुंबईसमोर आहे ‘ते’ मोठे आव्हान

दुबई : आयपीएलमध्ये काल पंजाब किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. पंजाबच्या या विजयामुळे आता गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. तसचे पंजाबच्या विजयामुळे प्ले ऑफमध्ये येण्याचे अन्य संघाचे गणित बिघडले आहे. पंजाबने आयपीएलध्ये आतापर्यंत 12 सामन्यातील 5 सामने जिंकले आहेत तर 7 सामन्यात पराभव झाला आहे. सध्या पंजाबचा संघ 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे. विशेष म्हणजे, पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांचे अजून प्रत्येकी 2 सामने बाकी आहेत. आणि या दोन्ही संघाचे गुणही समान आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये प्रवेशाची स्पर्धा आधिक तीव्र झाली आहे.

Advertisement

मुंबई इंडियन्सने अजून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवलेला नाही. मात्र, हा संघ दावेदार मानला जात आहे. आज मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर होणार आहे. दिल्लीचा संघ याआधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे त्यांनी आजचा सामना गमावला तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र, असेच मुंबईच्या बाबतीत घडले तर मात्र मुंबईच्या अडचणी वाढणार आहेत. मुंबईचेही 10 गुण आहेत.

Advertisement

मात्र, हा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचे अजून तीन सामने बाकी आहेत. त्यामुळे मुंबईकडे आणखी काही संधी आहेत. जर पुढील तीन सामन्यात चांगल्या रनरेटने विजय मिळवता आला तर मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश सहज मिळेल.

Advertisement

विराट कोहलीच्या बंगलोर संघाची प्ले ऑफमधील एन्ट्री जवळपास निश्चित आहे. हा संघ 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एक सामना जिंकणे गरेजेचे आहे. बंगलोरची सध्याची कामगिरी पाहता त्यांच्यासाठी हे कठीणही नाही. मुंबईसाठीच सध्या आव्हानात्मक परिस्थिती आहे. जर मुंबईने पुढील सर्व सामने जिंकले तर त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश घेता येईल. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत.

Advertisement

दरम्यान, आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स दरम्यान सामना होणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply