Take a fresh look at your lifestyle.

चेन्नईचा फायदाच फायदा.. हैदराबादचे मात्र नुकसान; पहा, कोणत्या संघाने घेतलीय आघाडी..

दुबई : आयपीएल मध्ये काल गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सजने हैदराबाद संघाचा दणदणीत पराभव केला. यंदाच्या आयपीएल मधील हैदराबादची कामगिरी पाहता या सामन्यात संघ पराभूत होईल, असाच अनेकांचा अंदाज होता. आणि घडलेही तसेच. हैदरबादने दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत चेन्नईच्या संघाने विजय नोंदवला. या विजयानंतर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघास मोठा फायदा झाला आहे तर दुसरीकडे, हैदराबादचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

या सामन्यात विजय मिळाल्यानंतर चेन्नईने पुन्हा गुणतालिकेत आपला प्रथम क्रमांक कायम राखला आहे. तसेच आणखी महत्वाचे म्हणजे या संघाने प्ले ऑफ मध्येही प्रवेश मिळवला आहे. हैदराबाद संघास आपले आव्हान कायम राखण्याची ही शेवटची संधी होती. मात्र, यामध्ये संघास अपयश आले. या पराभवानंतर हैदराबादचे आयपीएलमधील आव्हान आता संपुष्टात आले आहे.

Advertisement

या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे गोलंदाजांनी सिद्ध केले. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. सुरुवातीपासूनच हा संघ अडखळत राहिला. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत राहिल्याने भागीदारी करता आली नाही. संघाचा कोणताही फलंदाज यशस्वी ठरला नाही. त्यामुळे 20 ओव्हरमध्ये फक्त 135 रन्स करता आले. त्यानंतर चेन्नईच्या संघाने या माफक आव्हानाच यशस्वी पाठलाग केला. संघाची सुरुवातही दमदार होती. सलामीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर काही अंतराने विकेट पडल्या मात्र, नंतर आलेल्या फलंदाजांनीही कामगिरीत सातत्य राखत संघास विजय मिळवून दिला.

Advertisement

दरम्यान, आज आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स असा सामना होणार आहे. सलग विजय मिळाल्याने कोलकाता संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे पंजाबला मात्र आधीच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा सामना जास्त महत्वाचा ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply