.. म्हणून ‘त्या’ खेळाडूवर गौतम गंभीर संतापला; पहा, राजस्थानच्या पराभवाचे काय दिलेय कारण
दुबई : आयपीएल मध्ये काल विराट कोहलीच्या बंगलोर संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. हा सामना गमावल्यानंतर आता प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्याचा राजस्थानचा मार्ग आधिक कठीण झाला आहे. विशेष म्हणजे, प्रथम फलंदाजी करताना टीमने चांगली सुरुवात केल्यानंतर सुद्धा फक्त 149 रन्स करता आले. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर क्रिकेट विश्वातून जोरदार टीका होत आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर तर संघाच्या कामगिरीवर चांगलाच भडकला आहे. त्याने राहुल तेवतियावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानचे यशस्वी जयसवाल आणि इविन लुईस यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे संघाची सुरुवात चांगली झाली. हे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पुढील फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे 20 ओव्हरमध्ये फक्त 149 रन्स करता आले. राहुल तेवतिया ज्या पद्धतीने आऊट झाला त्यावर गौतम गंभीरने संताप व्यक्त केला.
मुळात ज्यावेळी संघास गरज होते आणि आक्रमक फलंदाजी करण्याची गरज नव्हती. तरी देखील फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नान तेवतिया आऊट झाला. आयपीएलमध्ये आपण इतके साममे खेळलो आहोत त्यामुळे भरपूर अनुभव मिळाल्याने त्या पद्धतीने फलंदाजी करणे त्याची जबाबदारी आहे, असे गंभीरने सांगितले.
100 रन्स असताना दुसरी विकेट पडली होती. त्यानंतर मात्र पुढील फलंदाज फार काळ टिकले नाहीत. त्यामुळे संघास फक्त 149 रन्स करता आले. त्यानंतर बंगलोरच्या संघाने यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला. या पराभवामुळे राजस्थानच्या अडचणी वाढणार आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता संघास आधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
दरम्यान, आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि हैदराबाद संघात सामना होणार आहे. या आयपीएलमध्ये हैदराबादची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याची शक्यताही आता मावळली आहे. त्यातुलनेत चेन्नई सुपर किंग्स आघाडीवर आहे. तसेच या संघाची प्ले ऑफमधील दावेदारीही मजबूत आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.