Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : ‘त्या’ कारणामुळे दिल्लीने सामना गमावला; पहा, नेमके काय ठरलेय पराभवाचे कारण

दुबई : आयपीएलमध्ये आज झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना अतिशय माफक लक्ष्य दिले होते. त्यानंतर कोलकाताने प्रत्युत्तर देत विजय मिळवला. या विजयानंतर कोलकाताचे प्ले ऑफमध्ये दावेदारी आणखी मजबूत झाली आहे. तर दिल्लीने मात्र प्ले ऑफमध्ये आपली दावेदारी पक्की केली आहे. या सामन्यात दोन्ही टीमच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. या विजयानंतर 10 गुणांसह कोलकाता संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Advertisement

याआधी दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना विशेष रन्स केले नाहीत. कोलकाताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. सुरुवातीच्या ओव्हरमध्येच दिल्लीचे महत्वाचे फलंदाज बाद झाले. त्यामुळे टीमला जास्त रन्स करता आले नाहीत. ऋषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सर्वाधिक प्रत्येकी 39 रन्स केले. या व्यतिरिक्त अन्य फलंदाज मात्र अपयशी ठरले. त्यामुळे दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 127 रन्सचे सोपे आव्हान दिले. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. याचे कारण म्हणजे, दिल्लीच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Advertisement

कोलकाता संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 5 व्या ओव्हरमध्ये दिल्लीला पहिले यश मिळाले. कागिसो रबाडा आणि आर. अश्विन या दोघांनी केलेल्या गोलंदाजीमुळे दिल्ली संघास सामन्यात आव्हान निर्माण करता आले. मात्र, रन्स जास्त नसल्याने कोलकाताला जास्त काळ रोखता आले नाही. त्यामुळे कोलकाताने दिल्लीचा पराभव केला.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply