Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर..धोनी नव्या भुमिकेत…

राष्ट्रीय निवड समितीने अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी (ICC T-20 World Cup)  स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

दिल्ली : सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर केलेल्या नव्या संघात कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी नव्या भुमिकेत दिसणार आहे.

Advertisement

राष्ट्रीय निवड समितीने अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी (ICC T-20 World Cup)  स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.त्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन व वरूण चक्रवर्ती यांनी आयपीएल (IPL) आणि भारतीय संघाकडून केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान दिले आहे.  तर संघात तब्बल पाच फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे.

Advertisement

सध्या इंग्लडमध्ये सुरू असलेल्या एकाही कसोटी संघात फिरकीपटू अश्विनला संधी देण्यात आली नाही. तर तब्बल चार वर्षे भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेल्या रविंद्रचंद्रन अश्विनला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र श्रीलंकेत राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली  मालिका जिंकलेल्या संघाचा कर्णधार असलेल्या शिखर धवन आणि सातत्याने धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ यांचा निवडसमितीने साधा विचारही केला नाही, असे माजी कसोटीपटू चेतन शर्मा यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

टी-20 विश्वचषक सर्धा येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान अमिराती व ओमानमध्ये होणार आहे. तर या स्पर्धेसाठी बीसीसीआयने सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कुल ओळख असलेला महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघाच्या मेंटॉरपदी निवड केली आहे. तर धोनी रवी शास्री यांच्यासोबत काम करणार आहे.

Advertisement

असा असेल भारतीय संघ-

Advertisement
  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, इशान किशन, रविंद्र जडेजा, रविंद्रचंद्रन अश्विन, राहुल चहर, वरूण चक्रवर्ती, अक्सर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. (राखीव- श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर व दीपक चहर)

Advertisement

Leave a Reply