Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जिल्हाधिकाऱ्याने रचला टोक्योत इतिहास, वाचा काय घडलं तेथे…

भारतीय खेळाडूंनी आपल्या जोरदार प्रदर्शनासह 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांवर नाव कोरले आहे.

दिल्ली : विविध क्रीडाप्रकारात देशाची मान उंचावण्यासाठी क्रीडापटू धडपडत असतात. संघर्ष करत असतात. त्यातच गेल्या महिन्यात देशाच्या क्रीडापटूंनी भारताची मान उंचावत एक सुवर्णपदकासह सात पदकांवर नाव कोरले. त्यापाठोपाठ सुरू झालेल्या टोक्यो पॅरॉलिंपिक स्पर्धेत भारताने आपली घोडदौड कायम सुरू ठेवत तब्बल 18 पदकांची कमाई केली. त्यातच ऑलिंपिक किंवा पॅरॉलिंपिकमध्ये भाग घेऊन जिल्हाधिकाऱ्याने इतिहास रचला.

Advertisement

भारतीय खेळाडूंनी आपल्या जोरदार प्रदर्शनासह 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांवर नाव कोरले आहे. त्यातच नोएडाचे जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांनी टोक्योच्या पॅरॉलिंपिक स्पर्धेत रविवारी पुरूष एकेरी एसएल 4 या क्रीडाप्रकारात नामांकित फ्रेंच शटलर लुकास माजूरवर 21-15, 17-21, 15-21 मात केली. यासह भारताची पदकसंख्या 18 झाली.

Advertisement

सुहास एलवाय हे देशातील पहिले अधिकारी आहेत  की, ज्यांनी ऑलिंपिक किंवा पॅरॉलिंपिक स्पर्धेत भाग घेत रौप्य पदकावर नाव कोरले. तसेच जागतिक क्रमवारीत सुहास तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सुहास यांनी यापुर्वी युगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये कांस्यपदक तर तुर्की इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये पुरूष सिंगल्स पुरस्कार मिळवला होता. याबरोबरच त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांवर नाव कोरले आहे. त्यांनी जकार्ता पॅरा एशियन गेम्स 2018 मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरूष संघाचा भाग होता. 2017  मध्ये टोक्योमध्ये आयोजिच जपान ओपन पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुहास उपविजेता ठरले होते तर दुहेरी एसएल 4 प्रकारात कांस्यपदक पटकावले.

Loading...
Advertisement

टोक्योमध्ये सुहासने पहिला गेम 21-15 असा जिंकला. पुढच्या दोन सामन्यात त्याने विरोधकांना कडवी झुंज दिली. मात्र त्या  सामन्यांमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला. पुढे लुकासने 21-17 आणि 21-15 दोन्ही गेम जिंकून सुवर्णपदक जिंकले. तर सुहासला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Advertisement

नोएडाचे जिल्हाधिकारी असलेल्या सुहासच्या विजयाने एक नवा इतिहास रचला गेला. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुहासचे अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply