spinach recipe :कमी मसाल्यात बनवलेली चविष्ट आणि आरोग्यदायी भाजी बनवायची असेल तर पालक अंड्याची करी करून बघू शकता. घरी बनवण्याची सोपी पद्धत येथे जाणून घ्या.
https://www.lokmat.com/travel/page/2/
किती लोकांसाठी: 3
साहित्य:
पालक प्युरी साठी
पालकाची पाने – 1 किलो, हिरवी मिरची – 1-2,
रस्सा साठी
उकडलेली अंडी – 6, तूप – 2, तमालपत्र – 1, जिरे – 1 टीस्पून, बारीक चिरलेला कांदा – 1 कप, आले-लसूण पेस्ट – 2 चमचे, मीठ – चवीनुसार, तिखट – 1 टीस्पून, हळद पावडर – 1 टीस्पून, गरम मसाला – 1 टीस्पून
टेम्परिंग साठी
तूप – 1 टीस्पून, जिरे – 1 टीस्पून, संपूर्ण लाल मिरची – 2
- November Travel: नोव्हेंबरमध्ये भेट देण्यासाठी “ही “आहेत भारतातील सर्वोत्तम 5 ठिकाणे एकदा पहाच
- Travel Tips: प्रवास करताना आजारपण टाळायचंय “या” सोप्या टिपा ठरतील फायदेशीर ,पहा कोणत्या ते
- Travel Tips : कमी बजेटमध्ये अशी होईल पॅरिस ट्रिप संस्मरणीय.. किती येईल खर्च घ्या जाणून
प्रक्रिया:
- एका मोठ्या पॅनमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा, त्यात एक चमचे मीठ(salt) घाला. दुसर्या पॅनमध्ये (pan )पाण्यात बर्फ(ice) घाला.
- पालकाची पाने स्वच्छ करून चाकूने मोठे तुकडे करून या पाण्यात टाका. 40-50 सेकंद उकळू द्या.
- आता ही पाने गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाका. यामुळे पालकाचा रंग टिकून राहतो.
- यानंतर ही पाने आणि हिरव्या मिरच्या(green chili ) मिक्सरमध्ये बारीक करा.
- त्याच बरोबर अंडी (egg)उकळण्यासाठी ठेवा.
- कढईत तूप गरम करा. गरम होताच तमालपत्र, जिरे, बारीक चिरलेला लसूण-आले (garlic ginger pest)घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
- यानंतर त्यात कांदा (onion)घालून हलका तपकिरी होईपर्यंत परता.
- यानंतर त्यात पालक(spinach) प्युरी, मीठ आणि सर्व मसाले एकत्र करा. 1-2 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
- उकडलेल्या अंड्याच्या मधोमध दोन तुकडे करा आणि ग्रेव्हीमध्ये घाला. आणखी 1-2 मिनिटे शिजवा.
- – फोडणीच्या पातेल्यात तूप गरम करा. जिरे, लाल मिरची घालून 1-2 सेकंद ठेवा. त्यानंतर पालक ग्रेव्हीमध्ये घाला.
- पालक अंडी करी भात किंवा रोटी बरोबर सर्व्ह करा, कोणालाही मजा येईल.