दिवाळीच्या काळात ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीने 21 ते 31 ऑक्टोबरदरम्यान 10 टक्के भाडेवाढ केली होती. भाढेवाढ झाली असून देखील प्रवाशांनी एसटीवर विश्वास दाखवला. यात काळात जळगाव विभागाने विक्रमी उत्पन्न मिळवत राज्यात पहिला नंबर मिळवला.नाशिक प्रादेशिक विभागात चोपडा आगाराने नंबर एक तर चाळीसगाव आगार क्रमाने नंबर दोनवर आला. या 10 दिवसांत जिल्ह्यामध्ये एसटी 30 लाख 86 हजार किलोमीटर फिरली. यातून एसटीला एकूण 11 कोटी 32 लाख 71 हजार उत्पन्न मिळाले.
कोरोना व एसटी कर्मचारी संपामुळे गेल्या दोन वर्षांत एसटीचे खूप मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची चाके जागेवरच थांबली . या दोन वर्षांत कोरोना व संप यामुळे माहेरवाशीण माहेराला देखील मुकली होती. त्यामुळे यंदा माहेरवाशीण, ज्येष्ठ नागारिक व अमृत वर्षातील सवलतीतील ज्येष्ठ नागरिकांमुळे प्रवाशांची संख्या वाढून एकूणच एसटीच्या उत्पन्नात भर पडली. दिवाळीत जिल्ह्यातील 11 स्थानकांतून एसटीने 30 लाख 86 हजार किलोमीटर प्रवास करत 11 कोटी 32 लाख 71 हजारांचे उत्पन्न भरघोस मिळवले. हे उत्पन्न महाराष्ट्रात 1 नंबरवर राहिल्याचे विभाग नियंत्रक श्री भगवान जगनोर यांनी सांगितले.
- Free Travel: “ही ” आहेत देशातील 5 प्रसिद्ध टिकणे जेथे तुम्ही राहू शकता मोफत
- Food recipe :घरी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी बनवायची आहे , तर मग “ही” रेसिपी एकदा ट्राय कराच
एका दिवसाच्या उत्पन्नातही पहिला नंबर :जळगाव एसटी विभागाने भाऊबिजेच्या दिवशी उत्पन्नाबाबत संपूर्ण राज्यात बाजी मारली . 26 ऑक्टोबरला भाऊबिजेच्या एका दिवसात एसटीने उभ्या महाराष्ट्रात 2 लाख 90 हजार किलोमीटर फिरून 1कोटी 19 लाख विक्रमी उत्पन्न मिळवले . हे उत्पन्न उभ्या महाराष्ट्रात नंबर एकचे तर आतापर्यंतच्या इतिहासात एका दिवसाचे सर्वाधिक उत्पन्न आहे . हे उत्पन्न 2019 मधील भाऊबिजेच्या एका दिवसाच्या उत्पन्नापेक्षा तब्बल 11 लाखाने अधिक आहे.
एस टी च्या ४४ आगारात चोपडा अव्वल :एसटीच्या नाशिक प्रादेशिकस्तरावरील 44 आगारांत 20 ते 31 ऑक्टोबरदरम्यान चोपडा आगाराने एक नंबर मिळवला असून चाळीसगाव आगार द्वितीय आले आहे. चाळीसगाव आगाराने एसटी बस 3 लाख 830 किलोमीटर फिरून 1कोटी 74 हजार 908 उत्पन्न मिळवले आहे. यात प्रवासी 197904 तर अमृत योजनेतील प्रवासी 18928 असून 216832 एवढ्या प्रवाशांनी या काळात एसटीतून प्रवास केला, अशी माहिती चाळीसगाव आगार व्यवस्थापक श्री संदीप निकम यांनी दिली.