Spam Calls । एक छोटी चूक आणि झटक्यात रिकामे होईल तुमचे बँक खाते, आजच टाळा ही चूक

Spam Calls । हल्ली फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. फसवणुकीमुळे अनेकांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. काही चुकांमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पण तुम्ही आता या चुका टाळू शकता.

स्पॅम कॉल्सकडे दुर्लक्ष करणे घातक

जर अनोळखी नंबरवरून कॉल आला तर तुमची बँकिंग आणि वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते. एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे, तुमची माहिती लीक होण्यास तुम्ही जबाबदार असाल.

अशी होते फसवणूक

पहिला मार्ग

फसवणूक करणारे वापरकर्त्यांना एका निश्चित पॅटर्नवर लक्ष्य करत असून काही दिवसांसाठी ठराविक वेळेत वापरकर्त्याला ब्लँक कॉल करून सिम स्वॅपिंगचा प्रयत्न केला जाईल.

सर्व काही फसवणूक करणाऱ्यांच्या योजनेनुसार चालले असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवरून नवीन नंबरची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर तुमचा डेटा सहज चोरला जाऊ शकतो.

दुसरा मार्ग

फसवणूक करणारे वापरकर्त्याला कॉल करून त्याच्या नावावर पार्सल आल्याची भीती दाखवतात. या पार्सलमध्ये आक्षेपार्ह वस्तू असल्याचा दावा केला जातो. यानंतर, तपासाचा हवाला देऊन, तुम्हाला तुमची कागदपत्रे आणि संवेदनशील माहिती विचारण्यात येते.

अशी घ्या स्पॅम कॉलबद्दल काळजी

1. तुमच्या संपर्कात नसलेल्या नंबरवरून तुम्हाला तुमच्या फोनवर कॉल आला, तर लगेच कॉल उचलू नका.

2. एकाच नंबरवरून दोनदा किंवा जास्त वेळा कॉल येत असल्यास या नंबरवरून कॉल उचला.

3. स्पॅम कॉलर शोधण्यासाठी फोनवर कॉलर-ओडेंटिफिकेशन ॲप वापरा.

4. तुम्हाला स्वयंचलित जाहिरात कॉल प्राप्त होतात, त्यावेळी कोणताही विलंब न करता ते त्वरित डिस्कनेक्ट करा.

असा ब्लॉक करा स्पॅम कॉल

इंटरनेटवर तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरचे नाव टाकून डू नॉट डिस्टर्ब सेवा तपासून ही सेवा सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
फोनच्या सेटिंग्जद्वारे स्पॅम कॉल्स ब्लॉक केले जाऊ शकतात. तुम्ही Google च्या फोन ॲपसह स्पॅम कॉलर ब्लॉक करू शकता.
जर तुम्ही गुगल ॲप वापरत नसाल तर तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन स्पॅम कॉलर्सना ब्लॉक करण्याचा पर्याय शोधा.

Leave a Comment