Sonakshi Sinha Marriage : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोराने होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोनाक्षी सिन्हा येत्या 22 जूनला अभिनेता झहीर इकबालसह लग्न करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी आणि झहीरचे लग्न 22 जूनला होणार आहे आणि रिसेप्शन 23 जूनला होणार आहे. लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित राहणार आहेत. सोनाक्षीला तिचे लग्न खाजगी ठेवायचे आहे आणि जास्त माहिती द्यायची नाही.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची पहिली भेट सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत झाली होती. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी ‘डबल एक्सएल‘ चित्रपटात एकत्र काम केले होते आणि अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया आणि लग्नाची तयारी यादरम्यान आता सर्वांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. बघूया ही आनंदाची बातमी कधी समोर येते आणि चाहत्यांना सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचा आनंद साजरा करण्याची संधी कधी मिळते.