Solar Eclipse 2022 :आज सूर्यग्रहण आहे जे संध्याकाळी 4.29 वाजता सुरू होईल आणि 5.30 पर्यंत चालेल. सूर्यास्तानंतर संध्याकाळी 5.43 ला संपेल.
Solar Eclipse 2022: वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार, २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी सूर्यग्रहण अर्धवट असेल आणि अर्धा तास चालेल. भारतात, दिल्ली व्यतिरिक्त, ते बेंगळुरू (कर्नाटक), कोलकाता (पश्चिम बंगाल), चेन्नई (तामिळनाडू), उज्जैन (मध्य प्रदेश), वाराणसी आणि मथुरा (दोन्ही उत्तर प्रदेश) येथे दिसेल. भारतात सूर्यग्रहण संध्याकाळी सुरू होईल, जे अनेक ठिकाणांहून पाहता येईल, परंतु त्याचा शेवट दिसणार नाही, कारण ते सूर्यास्तानंतर होईल.ग्रहण उघड्या डोळ्यांनी(naked eyes) पाहण्याचा सल्ला दिला जात नाही. जेव्हा चंद्र (moon) सूर्याचा(sun) बराचसा भाग रोखतो तेव्हाही डोळ्यांना कायमचे नुकसान होऊ शकते. ते बघूनही अंधत्व येऊ शकते.
https://www.tv9marathi.com/health
सूर्यग्रहणात (Solar Eclipse )सुरक्षित राहण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ते जाणून घ्या.
सूर्यग्रहण काळात काय करावे?
- ते पाहण्याचा सर्वात सुरक्षित आणि अचूक मार्ग म्हणजे योग्य फिल्टर वापरणे. जसे की ब्लॅक पॉलिमर, अॅल्युमिनाइज्ड, नंबर 14 शेड वेल्डिंग ग्लास आणि टेलिस्कोपद्वारे.
- नासाच्या(nasa ) सल्ल्यानुसार, सूर्यग्रहणाच्या वेळी आकाशाकडे (sky)पाहण्यापूर्वी, डोळ्यांवर काही प्रकारचे संरक्षण निश्चित करा.
- तुम्ही ग्रहण काळात गाडी चालवत असाल तर तुमचे हेडलाइट्स चालू ठेवा.
सूर्यग्रहण काळात काय करू नये
- सूर्यग्रहण पाहण्यासाठी सामान्य सनग्लासेस वापरण्याचा सल्ला दिला जात नाही.
- तुमच्या कॅमेराने ग्रहण रेकॉर्ड करणे टाळा. तुम्ही योग्य चष्मा वापरत नसल्यास, सूर्याच्या तीव्र किरणांमुळे तुमच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता नेहमीच असते.
- तुमच्याकडे योग्य चष्मा नसल्यास, तुमच्या मुलांनाही ग्रहण पाहण्यापासून रोखा.
सूर्यग्रहण कसे दिसते? जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधून जातो आणि हे तीन ग्रह एका सरळ रेषेत असतात. चंद्राची सावली कुठेही पडली तरी सूर्य दिसत नाही. या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.
- Women Word :देशासाठी शहीद झालेल्या पहिल्या महिला सैनिक : लेफ्टनंट किरण शेखावत
- Air India Women Pilot Joya Agarwal : झोया अग्रवाल या महिला पायलटला भेटा जिने आपल्या कष्टाने बालपणीची स्वप्ने केली साकार
- Diwali Last Minute Decoration:घरातील सजावट अपूर्ण वाटते, तर मग ” या” युक्त्यांची घ्या मदत…
पुढील सूर्यग्रहण केव्हा होणार आहे? भारतातून दिसणारे पुढील सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी अपेक्षित आहे. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल. देशाच्या सर्व भागातून हे आंशिक सूर्यग्रहण म्हणून पाहिले जाईल.
Disclaimer: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.