Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोलापूरचे शर्ट थेट दुबईला..! ऑपरेशन परिवर्तनमुळे झाली क्रांती; खासदार सुळे यांनी केले कौतुक

Please wait..

सोलापूर : सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने ऑपरेशन परिवर्तन उपक्रमांतर्गत महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी २० शिलाई मशीन चालवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. या प्रकालास भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Advertisement

Advertisement
Loading...

बुधवारी सकाळी मुळेगाव तांड्यावरील ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाची पाहणी करून खासदार सुळे यांनी आवाहन केले की, आता दुबईला सहलीला न जाता अजंठा – वेरूळची लेणी पाहा आणि सोलापूरचे ब्रँडेड कपडे घाला, सोलापूरचे नाव आपणच मोठे करा. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी दारू बंद करून अनेकाना काम दिले. हा पॅटर्न देशभरात कसा चालू करता येईल, यासाठी केंद्रीय गृह विभाग, टेक्स्टाइल मंत्रालयाशी बोलून याची माहिती देणार असल्याचेही सुळे यांनी म्हटले आहे.

Advertisement

मुळेगावचे सरपंच राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, नव प्रविष्ट आयपीएस अधिकारी साई कार्तिक, उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक सुहास जगताप, अरुण फुगे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.  देशभरात हा उपक्रम सुरू करता येईल का, याबाबतही पाठपुरावा करेन. जेव्हा भविष्यात डिझाइन तयार करण्याचे काम येथे सुरू होईल, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी आणते, असे सुळे यांनी सांगून पोलिस दलाचे कौतुक केले. (solpur police operation parivartan mp supriya sule and ips tajaswi satpute shg business and import export)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply