Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोलापूरच्या दुधासाठी ३२ जण रिंगणात; पहा कशी होणार आहे लढत

सोलापूर : महाराष्ट्रातील दुध व्यवसायाची सहकारी चळवळ (Maharashtra milk cooperative movement) अखेरच्या घंटा मोजत आहे. शेतकरी दुध उत्पादक (farmers milk producer) सभासदांना एकेकाळी मोठा आधार असलेली दुधाची चळवळ नेत्यांनी मलई खाल्ल्याने खासागीच्या घशात गेली आहे. त्याच दुधाच्या उरलेल्या मलईसाठी आता सोलापुरात (solapur milk) लढत होत आहे. त्यासाठी निवडणुक रिंगणात १७ जागांसाठी ३२ जण लढणार आहेत.

Advertisement

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यात प्रस्थापित नेते अपयशी ठरल्याने ही निवडणूक होत आहे. संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी एकूण उमेदवारी दाखल अर्ज ८७ दाखल झाले होते. त्यातील माघारी घेतलेले अर्ज ५५ असून आता शिल्लक उमेदवारी अर्ज ३२ आहेत. क्रियाशील संस्था मतदारसंघ २०, महिला प्रतिनिधी ७, भटक्या विमुक्त जाती २, इतर मागास वर्ग १, मागास २ असे संचालक निवडले जाणार आहेत. इतर मागास प्रवर्गातून सत्ताधारी गटाच्या दीपक माळी (कामती, ता. मोहोळ) यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला.

Loading...
Advertisement

संघ बचाव कृती समितीचे उमेदवार : क्रियाशील संस्था – अनिल अवताडे, भाऊसाहेब धावणे, संजय पोतदार, सुनीता शिंदे, सुवर्णा इंगळे, पार्वती पाटील, कांचन घाडगे. महिला प्रवर्ग -संगीता लोंढे, सरस्वती भोसले, भटक्या विमुक्त – रमजान नदाफ, अनुसूचित जाती – मंगल केंगार. तर, सत्ताधारी पॅनलचे रिंगणातील उमेदवार : क्रियाशील संस्था मतदारसंघ – संभाजी मोरे (माढा), रणजितसिंह शिंदे (माढा), राजेंद्र मोरे (माढा), अलका चौगुले (करमाळा), विजय येलपले (सांगोला), मारुती लवटे (सांगोला), बाळासाहेब माळी (पंढरपूर), वैशाली शेंबडे (मोहोळ), महादेव गरड (उत्तर सोलापूर), बबनराव आवताडे (मंगळवेढा), औदुंबर वादेकर (मंगळवेढा), योगेश सोपल (बार्शी). महिला प्रवर्ग – छाया ढेकळे (बार्शी), निर्मला काकडे (मंगळवेढा). भटक्या विमुक्त जमाती प्रवर्ग – राजेंद्रसिंह पाटील (करमाळा). इतर मागास प्रवर्ग – दीपक माळी (कामती, मोहोळ). मागास प्रवर्ग – जयंत साळे (मंगळवेढा).

Advertisement
Advertisement

Leave a Reply