Soilometer kit: अहमदनगर : शेतकरी साक्षरता हेच ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या बायोमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर / Biomi Technologies Private Limited, Address: Dathan Gunjal, Tal. Parner, Ahmednagar)) यांनी सॉईलोमीटर किट (Soilometer kit) हे अभिनव उपकरण तयार केले आहे. शेतामधील मातीचा जिवंतपणा तपासणी आणि त्यानुसार कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या ट्रिक्स शिकवण्याचे काम ‘बायोमी’तर्फे सुरू आहे. या कार्याचे कौतुक करतानाच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते सॉईलोमीटर किटचे लोकार्पण जयपूर (राजस्थान राज्य) येथे करण्यात आले.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
जयपूर येथील चौधरी चरण सिंग राष्ट्रीय कृषी विपणन संस्था यांच्या चौथ्या पदवीदान समारंभात (दि. 17 फेब्रुवारी 2023) या किटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यासह केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, खासदार कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड, रामचंद्र बोहरा, कृषी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव डॉ. विजया लक्ष्मी, प्रधान सचिव दिनेश कुमार आदि उपस्थित होते. बांधावरची प्रयोगशाळा उभारणी करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या ‘बायोमी’चे संचालक डॉ. प्रफुल्ल गाडगे (Prafulla Gadge) यांच्या कृषी संशोधन कार्याचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.
याबद्दल माहिती देताना डॉ. गाडगे यांनी सांगितले की, बायोमी हे अहमदनगर (महाराष्ट्र राज्य) येथील स्टार्टअप असून चौधरी चरण सिंग राष्ट्रीय कृषी विपणन संस्था यांच्या राष्ट्रीय कृषी विस्तार योजनेअंतर्गत इनक्युबेटेड आहे. कृषीमंत्री आणि कृषी कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेली कौतुकाची थाप ही खूप मोलाची आहे. आतापर्यंत आमची टीम आणि आम्ही हजारो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसह सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीसाठी करत असलेल्या कामाचे असे कौतुक झाल्याने शेतीच्या क्षेत्रात आणखी जोमाने काम करण्याची उर्मी मिळाली आहे.
डॉ. गाडगे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, देशातली पहिली मातीचा जिवंतपणा म्हणजेच मातीतील पिकांना उपयोगी सूक्ष्मजीवांचे प्रमाण प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांना सांगणारी अशी ही सॉईलोमीटर किट आहे. प्रत्यक्षात प्रयोगशाळेत तपासणी करता यासाठी तब्बल तीन दिवसांचा वेळ आणि दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सॉईलोमीटर किटच्या मदतीने फक्त तीनशे दहा रुपयात आणि तीनच तासांमध्ये शेतकरी स्वतः आपल्या बांधावरती मातीतल्या सजीवतेचे परीक्षण करू शकतो. म्हणूनच अनेकजण यास आता बांधावरची प्रयोगशाळा असेच म्हणत आहेत. या किटच्या माध्यमातून जिवाणू खते आणि जैविक कीटकनाशके यांचा दर्जा सुद्धा शेतकऱ्यांना घरच्या घरी तपासता येतो. यामुळे उच्च दर्जाच्या जैविक कृषी निविष्ठा शेतात वापरण्यास मदत होईल आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.