Cricket Update: सिल्हेट : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने सोमवारी महिला आशिया चषक (Women’s Asia Cup) स्पर्धेत थायलंडविरुद्ध (Thailand) मोठी कामगिरी केली. स्मृती मंधाना तिच्या कारकिर्दीतील १०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळली. डावखुरी फलंदाज (Left-handed batsman) असणारी व १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी, हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. थायलंडविरुद्ध हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत स्मृती मंधानाने कर्णधाराची भूमिका बजावली होती. भारतीय संघाने तुलनेने कमकुवत थायलंडचा डाव अवघ्या ३७ धावांत गुंडाळला आणि त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग एका विकेटच्या मोबदल्यात केला. स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने ९ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मंधानाला मात्र फलंदाजीची (Batting) संधी मिळाली नाही.
Indian captain 🇮🇳, Smriti Mandhana, who played her 100th T20I, and Jemimah Rodrigues, share their experience with the Thailand players 🇹🇭. #INDvTHAI #WomensAsiaCup2022 #AsianCricketCouncil #ACC pic.twitter.com/JGScwmbT3W
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 10, 2022
मात्र, १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी स्मृती मानधना ही भारताची चौथी क्रिकेटपटू ठरली आहे. मंधाना आणि हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त, फक्त भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) १०० किंवा त्याहून अधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यासह मंधाना आता कोहली आणि रोहितच्या स्पेशल क्लबमध्ये सामील झाली आहे.
- Must Read:
- Cricket : भारतीय खेळाडूंना ‘त्यासाठी’ परवानगी नाहीच.. BCCI अधिकाऱ्याने केले ‘हे’ वक्तव्य
- Health Tips: अधिकचे वजन वा लठ्ठपणा असेल तर होऊ शकतात हे गंभीर परिणाम; पहा सविस्तर
- Business Idea : फक्त 15 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय अन् कमवा 1 लाखांहून अधिक रूपये; पटकन करा चेक
- Agriculture News: Ahmednagar: दिवाळीत फुलांची सजावट ठरू शकते महाग; पावसामुळे उत्पादनात मोठी घट
भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू
- रोहित शर्मा – १४२ सामने
- हरमनप्रीत कौर – १३१ सामने
- विराट कोहली – १०९ सामने
- स्मृती मानधना – १०० सामने
स्मृती मानधना ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू आहे. तिने १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २३७३ धावा केल्या आहेत. या प्रकारात ती हरमनप्रीत कौरच्या मागे आहे. त्याच वेळी, ती टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) सर्वाधिक धावा करणारी चौथी भारतीय क्रिकेटर बनली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये २००० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या पाच भारतीय खेळाडूंपैकी स्मृती मानधना एक आहे. भारतीय महिला संघाने थायलंडचा ९ गडी राखून पराभव करत महिला आशिया कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.