मुंबई : सध्याच्या काळात कामकाज ऑनलाइन झाले आहे. कोरोना काळात तर वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे लॅपटॉप, स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या इलेक्ट्रॉनिक्स साधनांच्या मदतीने कामकाजात वेग आला आहे. आता तर स्मार्टफोन आणि लॅपटॉप नसेल तर काही काम करणेच शक्य होणार नाही अशी परिस्थिती आहे. मात्र बऱ्याचदा स्मार्टफोनचा वापर जास्त असल्याने फोन लवकर खराब होतो. त्यामुळे काही दिवसात पुन्हा नवीन फोन खरेदी करावा लागतो. परंतु, आपण जर आपल्या फोनची योग्य काळजी घेतली तर ही समस्या निर्माण होणार नाही. आणि विशेष म्हणजे, तुमचा जुना असला तरी नवीनच दिसेल. चला तर मग जाणून घेऊ या, काही महत्वाच्या गोष्टी ज्यांची काळजी घेतली तर तुमचा स्मार्टफोनही वर्षानुवर्षे नव्यासारखाच दिसेल.
स्मार्टफोनच्या ऑपरेट सिस्टीमसाठी कंपनीकडून वेळोवेळी अपडेट येत असतात. तसेच सिक्युरिटी अपडेट देखील येत असतात. हे अपडेट इन्स्टॉल करुन फोन अपडेट ठेवा. म्हणजे नवीन वैशिष्ट्यांसह फोनला अतिरिक्त संरक्षणही मिळेल.
फोनमध्ये अनेक अॅप असे असतात की त्यांचे कॅशे फाइल फोनचा वेग कमी करण्याचे काम करतात. त्यामुळे फोनमध्ये स्टोअर होत असलेले हे Cache क्लिअर करा. जेणेकरुन तुमचा फोन स्लो होणार नाही.
स्क्रीन प्रोटेक्शन फोनच्या स्क्रिनच्या संरक्षणासाठी महत्वाचे असते. फक्त स्कॅच नव्हे तर एखाद्या वेळी फोन खाली पडला तर स्क्रीनचे होणारे नुकसान टळते. त्यामुळे फोनच्या स्क्रीनला स्क्रीन प्रोटेक्शन असणे गरजेचे ठरते.
स्मार्टफोन खाली पडल्यानंतर फुटण्याची शक्यता असते. अशावेळी फोनला कव्हर असेल तर फोनचे संरक्षण होते. त्यामुळे फोनसाठी एखादे मजबूत कव्हर घ्यावे. सध्या स्मार्टफोन कंपन्या फोनबरोबर सिलिकॉन कव्हर देतात, ते देखील तुम्ही वापरू शकता.
स्मार्टफोनमध्ये नेहमी विश्वासार्ह आणि आधिकृत प्लॅटफॉर्मद्वारेच अॅप डाऊनलोड करा. अॅप डाऊनलोड करण्याआधी युजर्सचे रिव्ह्यू, अॅप डेव्हलपरचे नाव आणि अन्य आवश्यक माहिती चेक करणे आवश्यक आहे.
स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच; सोप्या गोष्टी ठरतील फायदेशीर; जाणून घ्या..