Smartphone Under 7000 : स्वस्तात खरेदी करा ‘हे’ फोन, मिळतील जबरदस्त फीचर्स; पहा यादी

Smartphone Under 7000 : जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता तगडे फीचर्स असणारे फोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. यादीत सॅमसंग ते Realme पर्यंत अनेक मोठे ब्रँडचा समावेश आहे.

Poco C55 स्मार्टफोन

Poco C55 या फोनमध्ये तुम्हाला 6.71 इंच HD+ डिस्प्ले पाहायला मिळेल. फोनच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळेल. तसेच या फोनमध्ये तुम्हाला दोन स्टोरेज पर्याय मिळतात, ज्यात 6GB + 5GB रॅम, 6GB + 128GB स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीच्या Poco C55 मध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. तसेच या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळेल.

Realme C30 स्मार्टफोन

तुमच्यासाठी Realme C30 स्मार्टफोन एक चांगला पर्याय असून कंपनीच्या फोनमध्ये 6.5 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे कॅमेरे चांगले आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल.

Redmi A1 स्मार्टफोन

फोनमध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंच IPS LCD स्क्रीन दिली असून तुम्ही सॉफ्टवेअर आणि मोठ्या डिस्प्लेसह दीर्घ बॅटरी आयुष्याला महत्त्व देत असाल, तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हा फोन Android 12 Go Edition आणि स्टॉक Android UI सह प्री-इंस्टॉल केला असून फोनची 5,000mAh बॅटरी आहे, तिची बॅटरी लाइफ देखील उत्तम आहे. या बजेट-फ्रेंडली फोनमध्ये 3.5 मिमी ऑडिओ कनेक्टर दिला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F04 स्मार्टफोन

कंपनीच्या या फोनमध्ये 6.5 इंच HD+ डिस्प्ले दिला असून जो वॉटर-ड्रॉप नॉचसह येतो. फोनच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंगच्या या फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर दिला आहे.स्टोरेज चा विचार केला तर या फोनमध्ये तुम्हाला ४ जीबी रॅम आणि रॅम प्लस फीचर मिळेल.

ज्यामुळे हा ८ जीबी रॅम पर्यंत ऑफर करतो. फोनमध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून ज्यात 13 MP मेन बॅक कॅमेरा आणि 2 MP सेकंड डेप्थ कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 5 एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 5,000 mAh ची बॅटरी आहे.

Leave a Comment