Smartphone Under 15K । बाजारात येणाऱ्या नवीन स्मार्टफोनच्या किमती खूप वाढल्या आहेत. अनेकांचे बजेट जास्त असतेच असे नाही, जर तुमचेही बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही देखील कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता.
Redmi 13C 5G
Redmi 13C 5G मध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर असून तो 8GB RAM सह जोडलेला आहे. या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3, 90Hz रिफ्रेश रेट आणि 600 निट्सची पीक ब्राइटनेससह 6.74″ HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप देखील दिला आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची मोठी बॅटरी मिळत आहे.
Samsung Galaxy M14 5G
सॅमसंग गॅलेक्सी M14 5G 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या फोनच्या यादीत समाविष्ट केला आहे. हा फोन सुपरफास्ट 5G कनेक्टिव्हिटीसह येत असून या फोनमध्ये तुम्हाला Exynos 1330 octa core प्रोसेसर पाहायला मिळेल, जो नवीनतम Android 13 सह जोडण्यात आला आहे.
याच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा मिळेल, ज्यात 50MP मुख्य कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल सांगायचे झाले तर यात 6000mAh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo T2x 5G
Vivo T2x 5G या फोनच्या किमतीचा विचार केला तर या फोनची किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीचा हा फोन 4GB RAM आणि 128GB ROM सह येतो. फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यात 6.58 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
यात तुम्हाला 50MP + 2MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल. इतकेच नाही तर या फोन मध्ये तुम्हाला 5000mAh ची मजबूत बॅटरी मिळत आहे. Vivo T2x 5G मध्ये तुम्हाला Dimensity 6020 प्रोसेसर मिळत असून ते मल्टीटास्कर्ससाठी चांगले आहे.